पूरग्रस्तांना भिवंडी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मदत

पूरग्रस्तांना भिवंडी तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने मदत

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आलेल्या महापुरामुळे प्रचंड मोठी हानी झाली. सद्य परिस्थितीला पुराची पातळी ओसरली असली तरी अनेकांचे संसार उध्वस्त होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व स्थरातून पूरग्रस्तांना मदत केली जात आहे. आता पोलीस पाटील संघटना देखील मागे राहिलेली नाही. भिवंडीतील महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना देखील पूरग्रस्तांच्या मदतीला धावून आली आहे. महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघटना भिवंडी तालुक्याच्या वतीने कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी ५५ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.


हेही वाचा – पूरग्रस्तांसाठी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे मदतीचा हात



कोल्हापूर
, सांगली येथील पूरग्रस्तांसाठी ५५ हजार रुपयांची आर्थिक मदत भिवंडी तालुक्यातील पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये ५५ हजार रुपयाचा डिडी प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर परीस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये सातारा, सांगली आणि कोल्हापुर आदी जिल्हे प्रामुख्याने प्रभावित होऊन येथील जनजीवन विस्कळीत होऊन जिवीत हानिसह मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील पोलीस पाटील परीवार, सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून तालुक्यात कार्यरत असलेल्या सुमारे १११ पोलीस पाटलांनी स्वखुशीने देणगी दिली आहे.

मदत कार्यामध्ये आवश्यकतेनुसार योगदान देण्यास भिवंडी तालुका पोलीस पाटील संघटना कटिबद्ध असून सामजिक कार्यास सदैव बांधील आहेसाईनाथ पाटील; ठाणे जिल्हा पोलीस पाटील संघटना अध्यक्ष


हेही वाचा – मदत पूरग्रस्तांना


 

First Published on: August 20, 2019 4:42 PM
Exit mobile version