महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मिरारोडमध्ये मोठी आग

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मिरारोडमध्ये मोठी आग

मीरारोड महापालिकेच्या आरक्षित जागेवरील मोकळ्या मैदानात एकूण नऊ एकरात प्लेझंट पार्क, एम.आय.डी. सी. रोड प्रभाग कार्यालय क्रमांक सहाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत ताटपत्री टाकून बेकायदेशीर बनलेल्या दुकांनाना गुरुवारी सायंकाळी आग लागली. आगीत काही गॅरेज व कपाटाची दुकाने आणि भंगार दुकाने जळून खाक झाली.

हाकेच्या अंतरावर महापालिका प्रभाग कार्यालय आहे. मात्र तरीही अनधिकृत बांधण्यात आली आहेत. याच ठिकाणी गेल्या वर्षीसुद्धा आग लागलेली होती. मात्र त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली नसल्याचे उजेडात आले आहे. अग्निशमन विभागाचे कर्मचारी तीन मिनिटांत घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली. स्वतः मुख्य अग्निशमन अधिकारी आणि पाच अधिकार्‍यासह एकूण ४६ जवान त्याठिकाणी हजर होते.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पाच फायरच्या गाड्या दोन टँकर व अतिरिक्त आरोग्य विभागाचे सहा टँकर पाणीपुरवठा करीत होते. आगीवर नियंत्रण मिळवत असताना आठ ते दहा गाळ्यातील भंगार सामान जळून खाक झाले. काही साहित्य वाचवण्यात यश आले आहे. आजूबाजूच्या दहा ते बारा गाळ्यांना आगीपासून वाचवण्यात यश आले आहे. येथील आगीवर नियंत्रण मिळण्यात आले आहे. काही दुकानांची नुकसान झाले, अशी माहिती प्र. मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

First Published on: January 24, 2020 5:19 AM
Exit mobile version