Salman Khan: मोठी अपडेट समोर; सलमान खानच्या घरात घुसली गोळी

Salman Khan: मोठी अपडेट समोर; सलमान खानच्या घरात घुसली गोळी

सलमान खान गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट समोर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

मुंबई: बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर रविवारी पहाटे 5 वाजता दोन अज्ञात हल्लेखोरांनी हवेत अनेक राऊंड गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढला. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी मुंबईतील वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासह पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून आरोपींना पकडण्यासाठी अनेक पथके तयार केली आहेत. सलमानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी फोनवर चर्चा केली आहे. तसंच एक मोठी अपडेटही समोर आली आहे. फायर करण्यात आलेल्या गोळीमधील एक गोळी सलमान खानच्या घरात घुसल्याचा दावा, एका खासगी वृत्तवाहिनीने केला आहे. (Big update on Salman Khan shooting case Chief Minister Eknath Shinde contact him on Phone)

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर अभिनेत्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवर चर्चा केली. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशीही चर्चा केली आहे. त्यांनी सलमान खानची सुरक्षा वाढवण्यास सांगितले आहे. सध्या त्याच्या घराबाहेर मोठा पोलीस फौजफाटा आणि फॉरेन्सिक टीम आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहेत.

यापूर्वी सलमानच्या वडीलांना चिठ्ठीद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यानंतर धमकीचा ई-मेलही आला होता. आता रविवारी 14 एप्रिल रोजी झालेल्या गोळीबाराचा संबंधही बिश्नोई ग‌ँगशी असल्याचं बोललं जात आहे.

फडणवीसांची प्रतिक्रिया (Fadnavis on Salman Khan)

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलमान खान गोळीबार प्रकरणावर पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. गोळीबार प्रकरणाची अधिक माहिती मिळाल्यावर त्यासंदर्भात तुम्हाला सांगितलं जाईल.

बिश्नोईच्या निशाण्यावर का आहे सलमान खान?

1998 साली हम साथ साथ हैं चित्रपटाच्या शूटींगदरम्यान सलमान खान राजस्थानमध्ये होता. त्यावेळी सलमान खानने दोन वेळा चिंकारा हरणांची शिकार केल्याचा आरोप आहे. लॉरेन्स बिश्नोई ज्या बिश्नोई समाजातून येतो, हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात हरणांना देवासमान मानलं जातं. हरणांची शिकार केल्याचा आरोप असल्यामुळे अवघ्या बिश्नोई समाजाचा सलमान खानवर प्रचंड राग आहे. याच रागातून लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमान खानला धमक्या देत असल्याचं सांगितलं जातं.

(हेही वाचा: Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार म्हणजे भाजपा सरकारची पोलखोल; राऊतांचं टीकास्त्र)

First Published on: April 14, 2024 2:25 PM
Exit mobile version