EDकार्यालया बाहेर झळकला ‘भाजप’ कार्यालयाचा बॅनर

EDकार्यालया बाहेर झळकला ‘भाजप’ कार्यालयाचा बॅनर

EDकार्यालया बाहेर झळकला 'भाजप' कार्यालयाचा बॅनर

पीएमसी बँक आणि एचडीआयएल या दोघांमधील कर्ज वाटप आणि आर्थिक व्यवहारप्रकरणी सध्या ईडीचा तपास सुरु आहे. त्या तपासा अंतर्गत काही संशयास्पद व्यवहार वर्षा राऊत यांच्या खात्यात झाल्याची माहिती सक्तवसुली संचालनालय (ईडी)ला मिळाली. त्याबाबतचा पुढील तपास करण्यासाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले. दरम्यान, संदय राऊत यांनी शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन ईडीच्या नोटीसवरुन भाजपावर घणाघात केला. यावेळी ते म्हणाले की, भाजपचा पोपट असला तरी मी ईडीचा आदर करतो, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावली. त्याचप्रमाणे सातत्याने अनेकांना ईडीच्या नोटीसा येत आहे, यावरुन ईडीमध्ये भाजपने कार्यालय उघडल्याचे दिसून येत आहे, असा निशाणा साधत राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे.

ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजपचे फलक

मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असा फलक लावण्यात आल्याचे समोर आले आहे. हा फलक शिवसेनेकडून लावण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

विरोधकांचा प्रत्येक हिशोब माझ्याकडे

‘एचडीआयएलने (HDIL) भाजपला किती देणगी दिली याचा माझ्याकडे हिशोब आहे. भाजपच्या नेत्यांची संपत्ती १६०० पटीने वाढली आहे. याची ईडीने चौकशी केली आहे. भाजपचा पोपट असला तरी मी ईडीचा आदर करतो. राजकीय वैफल्यातून ईडीच्या नोटीशी पाठवल्या जातात. विरोधकांचा प्रत्येक हिशेब माझ्याकडे आहे’, असाही हल्लाबोल राऊत यांनी भाजपवर केला.

किरीट सोमय्यांचा राऊत यांना सवाल

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटर वरुन संजय राऊत यांना सवाल केला आहे. पत्रकार परिषद घेऊन सुद्धा ईडीबाबत काहीही बोले नाही. तसेच एचडीआयएलचा आणि प्रवीण राऊत यांचा नेमका काय संबंध असा सवाल उपस्थित केला आहे.

इडीच्या कार्यालयात वावर असणारे नेते कोण हे स्पष्ट होईल

‘माझ्याकडे भाजपच्या १२० नेत्यांची माहिती तयार आहे. अंमलबजावणी संचलनालय (इडी)च्या केसेस त्यामध्ये फीट बसतील, इडी त्यांच्यावर काय कारवाई करणार? असा सवाल शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केला. इडीच्या बॅलर्ड पियर येथील कार्यालयात कोणत्या भाजप नेत्यांचा वावर आहे हे तपासावे. त्यामधून इडीच्या कार्यालयात वावर असणारे नेते कोण हे स्पष्ट होईल, असेही विधान राऊत यांनी केले. तीन महिन्यात भाजपचे तीन लोक इडीच्या कार्यालयात जातात. तिथून काही कागद बाहेर काढतात. माझ्याकडे पुरावे आहेत असाही खुलासा त्यांनी केला.


हेही वाचा – मी तोंड उघडल तर केंद्रातल्या सरकारला हादरे बसतील – संजय राऊत


First Published on: December 28, 2020 4:00 PM
Exit mobile version