नव्या सरकारच्या शपथविधीला भाजपचा आक्षेप

नव्या सरकारच्या शपथविधीला भाजपचा आक्षेप

महाआघाडीच्या मंत्र्यांचा शिवाजी पार्क मैदानावर झालेला शपथविधी नियमबाह्य असल्याचे सांगत भारतीय जनता पक्षाने त्यावर आक्षेप घेतला आहे. ‘या शपथविधीवेळी आमदारांना त्यांच्या नेत्यांची नावे घेतली, हे संविधानाच्या चौकटीत बसणारे नसून नियमबाह्य आहे. त्यामुळे हा शपथविधी रद्द करावा, अशी मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे,’ अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडीचा शपथविधी हा बेकायदेशीर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीदेखील त्यांना अनेकदा टोकलं. शपथविधीचीही एक पद्धत असते. त्यानुसारच शपथ घ्यावी लागते. परंतु नव्या सरकारकडून ठरलेल्या पद्धतीनुसार शपथ घेण्यात आली नाही, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. तसंच याविरोधात राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सुप्रीम कोर्टातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते, असं ते म्हणाले. नव्या सरकारकडून नियम धाब्यावर बसवून काम करण्यात येत आहे. राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पुन्हा मतदानाद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत तेच अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांना बदलता येत नाही. परंतु नव्या सराकरनं कालिदास कोळंबकर यांना हटवून त्यांच्या जागी वळसे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. काल त्यांनी अध्यक्षपदाची शपथही घेतली. त्यातच आज विश्वासदर्शक ठराव आणि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक असं पहिल्यांदाच घडत असल्याचं पाटील म्हणाले. अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानानं न करता उघडपणे होत आहे. ही नियमांची पायमल्ली असल्याचं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – 

नाना पटोले विरूद्ध किसन कथोरे; विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस

First Published on: November 30, 2019 1:04 PM
Exit mobile version