भाजपने २०१४ ला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही – आनंद शर्मा

भाजपने २०१४ ला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही – आनंद शर्मा

भाजपने २०१४ ला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही

शेतकऱ्यांच्या उत्पाकांना प्रोत्साहन देणार, शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय आयोग निर्माण करणार, आरोग्य क्षेत्रात अधिक भर देणार, सरकारी रुग्णालयात मोफत उपचार देणार असून डॉक्टरांची संख्या देखील वाढवणार आहे. तसेच देशाचा पैसा आम्ही आरोग्यसेवेसाठी वापरणार अशा घोषणांचा भडीमार असलेला जाहीरनामा काँग्रेसने गुरुवारी मुंबईत प्रकाशित केला. या दरम्यान, ‘भाजपने २०१४ ला दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही’ असा घणाघात आनंद शर्मा यांनी यावेळी केला. तसेच या जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम नष्ट करणे, घुसखोरी क्षेत्रात लष्कर विशेषाधिकार कायद्यात बदल करणे, अशा घोषणा असल्यामुळे हा जाहीरनामा काँग्रेसविरोधकांच्या टीकेचे लक्ष्य ठरला आहे. ‘हम निभाऐंगे’ असे शीर्षक असलेला हा जाहीरनामा न्याय आणि रोजगार या संकल्पनेवर आधारित असल्याचे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी आपल्या घोषणेत सांगितले आहे.

‘गरिबीवर वार, सत्तर हजार’

देशातील गरिबांना वर्षाला ७२ हजार, सहा महिन्यांत २२ लाख नोकर्‍या, शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प अशा घोषणांचा भडीमार असलेला जाहीरनामा मंगळवारी काँग्रेसने प्रकाशित केला असून आज हा जाहीरनामा मुंबईत देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. ‘गरिबीवर वार, सत्तर हजार’ अशी घोषणा करत हा जाहीरनामा देशातील जनतेपुढे मांडला गेला. या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी घोषणा नाही, असे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी यावेळी सांगितले आहे. मुंबई येथे पत्रकार परिषदेत काँग्रेसने २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, प्रिया दत्त, उर्मिला मातोंडकर, संजय पाटील, कृपाशंकर सिंह आणि नसीम खान उपस्थित होते. ‘हम निभाऐंगे’ असे शीर्षक असलेला हा जाहीरनामा न्याय आणि रोजगार या संकल्पनेवर आधारित असल्याचे आनंद शर्मा यांनी सांगितले आहे.

First Published on: April 4, 2019 1:46 PM
Exit mobile version