Maharashtra Lockdown:…तर भाजप दुकाने खुली करणार; मंगल प्रभात लोढा यांचा इशारा

Maharashtra Lockdown:…तर भाजप दुकाने खुली करणार; मंगल प्रभात लोढा यांचा इशारा

संग्रहित छायाचित्र

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांना कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे राज्य सरकारने जर येत्या १ जूननंतर दुकाने खुली करण्याची परवानगी दिली नाही तर भाजप दुकाने खुली करेल, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार मंगल प्रभात लोढा यांनी शनिवारी दिला. लोढा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना लोढा यांनी १ जूनपासून दुकाने सुरू करण्याची मागणी केली. सरकारने छोटे दुकानदार आणि व्यापारी यांची परीक्षा घेऊ नये. राज्यात २० लाखांहून अधिक दुकानदार, व्यापारी आहेत. या दुकानदार आणो व्यापाऱ्यांवर उदरनिर्वाहासाठी अनेक कुटुंब अवलंबून आहेत. मात्र दुकानेच बंद असल्याने आर्थिक उलाढाल थांबली आहे, असे लोढा म्हणाले. लॉकडाऊन काळात दुकाने बंद होती. त्यामुळे जीएसटी आणि विजेच्या बिलामध्ये सूट देण्यात यावी, अशी मागणी लोढा यांनी राज्यपालांकडे केली.


हेही वाचा – चंद्रपूरची दारुबंदी उठवण्याच्या निर्णयाचा विरोध करणारी भाजपा ‘मालपाणी’ची पुरस्कर्ती: सचिन सावंत यांचा भाजपला टोला


 

First Published on: May 29, 2021 7:59 PM
Exit mobile version