‘सूडाचं राजकारण करू नये’, बोलणारेच सूडाचं राजकारण करतायत – प्रवीण दरेकर

‘सूडाचं राजकारण करू नये’, बोलणारेच सूडाचं राजकारण करतायत – प्रवीण दरेकर

‘कर नाही त्याला डर असण्याचं कारण नाही. ती संस्था माझ्या एकट्याची नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे लोकंही तिथे आहेत. संचालक एकटा निर्णय घेत नसतो हे नोटीस पाठवणाऱ्यांना कळायला हवं. सगळे निर्णय घेत असतात. आम्हाला जी नोटीस आधीच पाठवली आहे, त्यांची उत्तरं दिली आहेत. चौकशीमध्ये देखील सहकार्य करत आहे’, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मांडली आहे. माय महानगरच्या खुल्लम खुल्ला कार्यक्रमात ते बोलत होते. मुंबै बँक कथित घोटाळा प्रकरणी त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटिशीवर ते बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर परखड शब्दांत टीका केली. त्यासोबतच राज ठाकरेंबद्दल आपला आदर देखील व्यक्त करत मनसेमधील अनुभव देखील सांगितला.

सूडाचं राजकारण अपेक्षितच होतं!

दरम्यान, सरकारविरोधी भूमिका घेतल्यानंतर सुडाचं राजकारण होईल, हे अपेक्षितच होतं, असं दरेकर यावेळी म्हणाले. ‘काही लोकं सुपारी घेतल्यासारखे वागतायत. माझं व्यक्तिगत कुणाशीची वाद नाही. मी जाणीवपूर्वक कुणावर टीका करत नसतो. मी सरकारवर टीका करायला लागलो, तेव्हा सूडाचं राजकारण करू नये असं बोलणारेच सु़डाचं राजकारण करतील हे अपेक्षित होतं. उद्धव ठाकरे एकवेळ करणार नाहीत. पण राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळ्या झाडतीलच हे माहीत होतं’, असं प्रवीण दरेकरांनी यावेळी बोलताना सांगितलं.

राष्ट्रवादीच्या ताब्यातल्या संस्थांमध्ये घोटाळे

यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर परखड टीका केली. ‘वर्धा, नागपूर, बुलढाणा या बँकांमध्ये घोटाळे झाले आहेत. मी आता त्यांची चौकशीची मागणी करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातल्या ९०-९५ संस्था काढल्या, तर एकही संस्था नाही जिच्यात घोटाळा नाही’, असं ते म्हणाले.

पाहा संपूर्ण मुलाखत :

https://www.facebook.com/mymahanagar/videos/217711569713579

First Published on: November 26, 2020 4:33 PM
Exit mobile version