आडगावला वाहनांची तोडफोड प्रकरणी दोघांना अटक

आडगावला वाहनांची तोडफोड प्रकरणी दोघांना अटक

जुन्या भांडणाची कुरापत काढून रिक्षातून आलेल्या दोघांनी तीन टेम्पो व कारवर दगडफेक करून काचांची तोडफोड करत दहशत पसरवल्याची घटना सोमवारी (दि.२२) सायंकाळी बिडीकामगारनगर परिसरात घडली. याप्रकरणी एकनाथ मोहिते यांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी राहुल डोलनार (वय २४) व कृष्णा बिडगर (५३, रा. बिडीकामगारनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, जुन्या भांडणाची कुरापत काढून बिडीकामगारनगर येथे आलेल्या डोलनार व बिडगर या संशयितांनी मोहिते यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत मारहाण करून तीन टेम्पो व एका कारवर दगडफेक करून तोडफोड केली.

First Published on: June 23, 2021 11:10 AM
Exit mobile version