भाजप पदाधिकार्‍याचे काँग्रेस उपाध्यक्षावर सुरीने वार

भाजप पदाधिकार्‍याचे काँग्रेस उपाध्यक्षावर सुरीने वार

प्रातिनिधिक फोटो

भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे समर्थक मानले जाणार्‍या आणि भाजप पदाधिकारी गंगाधर भोसले यांनी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी महेश मिरानी यांच्यावर सुरीने वार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भोसले यांच्या साथीदारांनी मिरानी यांचा मुलगा आणि त्यांच्या मित्रांनादेखील बेदम मारहाण केली. याप्रकरणी गंगाधर भोसले व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्हासनगर 4 येथे मेन मार्केट रस्त्यावर गंगाधर भोसले यांच्या साथीदारांनी एक बॅनर लावले होते. हे बॅनर मिरानी यांच्या कार्यकर्त्यांनी हटवल्याचा समज करून बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास गंगाधर भोसले , दीपक सुंदराणी व अन्य दोन इसमांनी महेश मिरानी, त्यांचा मुलगा दीपक, पवन आणि एक अन्य इसम जावेद यांना काठ्यांनी मारहाण केली. नंतर रागाच्या भरात भोसले यांनी महेश मिरानी यांच्या गळ्यावर सुरीने वार केले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी गंगाधर भोसले व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदविला. या प्रकरणामुळे उल्हासनगर काँग्रेस शहरजिल्हा अध्यक्ष राधाचरण करोतिया यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिस्टमंडळाने पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांची भेट घेऊन मिरानी यांच्यावर हल्ला करणार्‍या आरोपींना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली, तर यासंदर्भात गंगाधर भोसले यांना विचारले असता ते म्हणाले की, मला राजकीय षड्यंत्राद्वारे खोट्या गुन्ह्यात फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

First Published on: March 8, 2019 4:55 AM
Exit mobile version