भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीविरोधात तक्रार

भाजपची काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीविरोधात तक्रार

निवडणूक आयोग

भाजप सरकारविरोधात खोट्या जाहिराती देऊन जनतेची दिशाभूल केल्याबद्दल भाजप शिष्ठमंडळातर्फे काल, सोमवारी रात्री दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधीत पक्ष प्रमुखांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर, आमदार मनिषा चौधरी, उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

जनतेची दिशाभूल करणारी जाहिराती

याबाबत अधिक माहिती अशी की, “काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीने भाजप सरकारविरोधात आक्षेपार्ह आणि जनतेची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती टीव्ही वाहिन्यांना दिल्या आहेत. या जाहिराती टीव्हीवर प्रसारित केल्या जात आहेत. त्यामुळे भाजप सरकारची बदनामी होत आहे. जनतेची दिशाभूल, फसवणूक होत आहे, अशी माहिती आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.

पक्ष प्रमुखांवर फौजदारी गुन्हा दाखल

या जाहिरातींमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, “भाजप सरकार शेतकऱ्याच्या खात्यात १० रूपये जमा केले होते. ते शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यात जमा झाले. त्या १० रूपयांनी काय होणार. या सरकारविरोधातील खोट्या जाहिरातींमुळे जनतेची दिशाभूल होत आहे. या जाहिराती तात्काळ बंद कराव्यात. निवडणूक आयोगाने संबंधित पक्ष प्रमुखांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा तसेच त्यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी”, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. त्यांच्यासोबत आमदार मनिषा चौधरी, उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा – 

राज ठाकरेंच्या ‘लाव रे तो..’ नंतर हरिसाल गाव उपसरपंचाचा व्हिडिओ!

युतीचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्यावर १३ गुन्हे दाखल

First Published on: April 22, 2019 7:42 PM
Exit mobile version