ऑनलाईन गाड्यांची लूट करणारी टोळी जेरबंद

ऑनलाईन गाड्यांची लूट करणारी टोळी जेरबंद

ऑनलाईन कार खरेदीत फसवणूक करणारी टोळी जेरवंद

बीकेसी पोलिसांची धडक कारवाई
मुंबईच्या बिकेसी पोलिसांनी ओएलएक्स या संकेत स्थळावर गाडी विकत घेण्याच्या बहाण्याने गाडी चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अयाज सय्यद आणि आरीफ सय्यद नावाच्या दोघांना अटक करत त्यांच्याकडून आठ आलीशान गाड्या जप्त केल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये बिएमडब्लू, होंडा सिव्हीक, इनोव्हा सारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे.
असे करायचे गाडी मालकाची फसवणूक
गाड्या चोरण्यासाठी या आरोपींनी सिनेमात शोभेल अशी शक्कल लढविली होती. मात्र हा प्रकार फार काळ चालला नाही. सुरवातीला ही टोळी ओएलएक्स संकेत स्थळावर गाडी हेरत असे. जी गाडी यांना पसंत पडत असे त्याच्या मालकाशी संपर्क साधून व्यवहार करत व गाडीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेत असत. गाडी पसंत पडताच हे मालकाला पैसे त्याच्या बँक खात्यात जमा झाल्याचा NEFT चा खोटा एसएमएस करुन ग्राहकाची दिशा भूल करत असत आणि गाडी मालका कडून गाडीची कागदपत्रे व गाडी घेऊन पसार होत असत.
पीडित गाडीचा मालक पैसे मिळाल्याच्या संभ्रमात असे पण प्रत्यक्षात मात्र हा मेसेज खोटा असायचा. गाडी विकणाऱ्या पीडित मालकाच्या खात्यात काहीच जमा होत नसे. अशाच एका प्रकरणात पीडित मालकाला आपली फसवणूक झाल्याचे कळताच बिकेसी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यावर बिकेसी पोलिसांच्या अथक प्रयत्ना नंतर दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आल आहे. या प्रकरणातील आणखी एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

First Published on: May 22, 2018 11:05 AM
Exit mobile version