मुंबईतील उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी ७० कोटींचा खर्च करण्यात येणार!

मुंबईतील उद्याने, मैदानांच्या देखभालीसाठी ७० कोटींचा खर्च करण्यात येणार!

मुंबई शहर आणि उपनगरे येथील २४ वॉर्डातील पालिका उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे यांच्या देखभालीसाठी एका वर्षाकरिता कंत्राटदारांवर तब्बल ७० कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. मात्र ही कंत्राटकामे करणारे कंत्राटदार हे किमान २२ टक्के ते ४१ टक्के कमी दरात कामे करणार असल्याने कमी दरात चांगल्या दर्जाची कामे होणार कशी, असे सवाल विरोधी पक्ष अथवा पालिकेतील पहारेकरी भाजपच्या नगरसेवकांकडून उपस्थित केला जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव वादग्रस्त ठरणार आहे.

वास्तविक, मुंबईतील पालिकेची उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे यांच्या उभारणीवर व पुढे देखभालीवर पालिका प्रशासन कोट्यवधी रुपये उधळले. मात्र तरीही पालिकेच्या उद्यानात स्वच्छतेचा अभाव असतो. मनोरंजन खेळणी तुटक्या अवस्थेत, हिरवळ हरवलेली असते. दिवाबत्ती व्यवस्थेत त्रुटी असते. कधी कधी माळी, चौकीदर जागेवर नसतात. त्याचप्रमाणे मनोरंजन मैदानांचीही दुरवस्था पाहायला मिळते. तर मोकळ्या जागांवर अतिक्रमण झालेले आढळून येते. रस्ते दुभाजक तुटलेले असतात. वाहतूक बेटांचीही दूरवस्था झालेली पाहायला मिळते. संबंधित कंत्राटदार नीटपणे लक्ष देत नाहीत, असे आरोप सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात येतात. मात्र तरीही पालिका प्रशासन आपली उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते दुभाजक, वाहतूक बेटे यांच्याबाबत सतर्क नसल्याचे दिसून येते.


हेही वाचा – मुंबईच्या सांस्कृतिक ठेव्याच्या साक्षीदाराची सेंच्युरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे १००व्या वर्षात पदार्पण


 

First Published on: January 10, 2022 10:57 PM
Exit mobile version