मुंबईत २४ तासात १९२ पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती, सुदैवाने १९६ नवजात बाळं सुखरूप

मुंबईत २४ तासात १९२ पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती, सुदैवाने १९६ नवजात बाळं सुखरूप

प्रातिनिधीक फोटो

देशभर कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईत २४ तासात १९२ कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली मात्र सुदैवाने १९६ नवजात बाळं सुखरूप असून ते सर्व कोरोना निगेटिव्ह आहेत.

मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात प्रसुती झालेल्या १९२ महिलांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मात्र सुदैवाने १९६ नवजात बाळांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आई कोरोना पॉझिटिव्ह असूनही हे सर्व बालक सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.

महिलांना कोरोना असल्याने केली बाळांची चाचणी

मुंबई सेंट्रल येथे असलेल्या नायर रुग्णालयात गेल्या २४ तासात १९२ कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली असून त्यांनी १९६ बाळांना जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांना कोरोना असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून बाळांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने यातील एकाही बाळाला कोरोनाची लागण झालेली नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यापैकी १३८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

आई पॉझिटिव्ह मात्र बाळ निगेटिव्ह

या १९२ कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्या गरोदर मातांनी १९६ नवजात बालकांना जन्म दिला असून त्यात दोन जुळी आणि एक तीळी बालके जन्माला आली आहे. या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात त्या बाळांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

तसेच मुंबईतील नायर रुग्णालयात १४ एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास ३२५ कोरोना पॉझिटिव्ह माता वेगवेगळ्या कारणांनी दाखल झाल्या असून त्यापैकी काहींची प्रसुती झाली तर काही महिलांवर उपचार सुरू आहेत.


यवतमाळमध्ये कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद!


दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ७ हजार ९६४ नवे रुग्ण आढळले असून २६५ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख ७३ हजार ७६३ वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा ४ हजार ९७१ आहे. सध्या ८६ हजार ४२२ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असून ८२ हजार ३७० जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.

First Published on: May 30, 2020 1:44 PM
Exit mobile version