मुंबईत सर्व बोर्डाच्या परीक्षा घेण्यास पालिका आयुक्तांची परवानगी

मुंबईत सर्व बोर्डाच्या परीक्षा घेण्यास पालिका आयुक्तांची परवानगी

मुंबई महापालिका

सध्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. ही वस्तुस्थिती असली तरी सरकार व पालिकेने शाळा सुरु केल्याने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता विचारात घेऊन सर्व शाळा १५ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे अगोदरच जाहीर केले आहे. मात्र या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून केंब्रिज, सीबीएसईसह सर्व बोर्डाच्या परिक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास पालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. यासंदर्भातील एक परिपत्रक पालिकेच्या शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी महेश पालकर यांनी ते रात्री उशिराने जारी केले आहे.

जानेवारी महिन्यातच होणार परीक्षा!

शाळा बंद असतानाच केंब्रिज बोर्डाच्या ९ वी ते १२ वीच्या परीक्षा २३ जानेवारी पासून सुरू होत आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या, सीबीएसई, सीआयएससीई, आयबी, आयजीसीएसई बोर्डाच्या परिक्षा नियोजित केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे घेण्यास पालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

मात्र, परीक्षा घेताना कोरोना संदर्भातील मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे आदी नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, असे सदर परिपत्रकात म्हटले आहे.

First Published on: January 13, 2021 8:55 AM
Exit mobile version