महापालिकेत लवकरच उंच, तगड्या सुरक्षा रक्षकांची वर्णी

महापालिकेत लवकरच उंच, तगड्या सुरक्षा रक्षकांची वर्णी

महापालिकेत लवकरच उंच, तगड्या सुरक्षा रक्षकांची वर्णी

मुंबई महापालिकेच्या उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी उपायुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर आता महापालिकेने सुरक्षा खात्यांमध्ये बदल आणण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच लवकरच मुख्यालयाच्या सुरक्षेसाठी उंच आणि तगड्या सुरक्षा रक्षक तैनात केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या बदलापूर्वीच सुरक्षा विभागाने महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर परेडचा गणवेशधारी सुरक्षा रक्षक तैनात केला आहे. या अनोख्या बदलामुळे आयुक्तांचा द्वारपाल वेगळया पेहरावात दिसत असला तरी या पेहरावामुळे सुरक्षा रक्षकाच्या अंगाची लाही लाही होत आहे. त्यामुळे हा बदल कितीसा पथ्यावर पडतोय याकडेच सर्वांचे लक्ष आहे.

उपायुक्तांनी दिले निर्देश

मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अधिकारी प्रभात रहांगदळे यांच्याकडे उपायुक्त पदाचा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे सुरक्षा व आपत्त्कालिन विभागांचा कारभार दिला आहे. मात्र, सुरक्षा विभागाची जबाबदारी हाती घेताच त्यांनी प्रमुख सुरक्षा अधिकारी विनोद बाडकर यांना निर्देश देत सुरक्षा खात्यांमध्ये काही बदल सुचवले आहे. ज्यामुळे व्हीआयपी अर्थात आयुक्तांच्या दालनाबाहेरील सुरक्षा रक्षकांचा पेहराव बदलत त्यांनी परेडचा गणवेश धारण करून आयुक्तांच्या दालनाबाहेर सेवा बजावावी,असे निर्देश जारी केले. त्यामुळे आयुक्तांच्या दालनाबाहेर परेडच्या गणवेशातील सुरक्षा रक्षक तैनात झालेला पहायला मिळत आहे.

मुख्यालयात आता उंच, तगडे सुरक्षा रक्षक

महापालिका मुख्यालयातील विद्यमान सुरक्षा रक्षकांमधील मरगळ दूर करण्यात येणार आहे. यापुढे विविध वॉर्ड आणि इतर कार्यालयात असलेल्या उंचापुर्‍या आणि तगड्या सुरक्षा रक्षकांची वर्णी मुख्यालयात लावली जाणार आहे. त्यामुळे मुख्यालयातील काही उंच व तगड्या सुरक्षा रक्षकांना कायम ठेवून उर्वरीतांची बदली अन्य विभागांमध्ये तसेच कार्यालयांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय आता अतिरिक्त आयुक्तांच्या तसेच महापौरांच्या सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षा रक्षकांनाही वेगळ्याप्रकारचा गणवेश देण्याचाही विचार सुरक्षा विभागाच्यावतीने सुरु असल्याचेही समजते.


हेही वाचा – महापालिका प्रशासनाला चूक कळली, निधी चौधरी सहआयुक्तच

First Published on: August 7, 2019 9:24 PM
Exit mobile version