स्वच्छ खासगी रुग्णालयात ‘कोहिनूर हॉस्पिटल’ दुसऱ्या क्रमांकावर

स्वच्छ खासगी रुग्णालयात ‘कोहिनूर हॉस्पिटल’ दुसऱ्या क्रमांकावर

स्वच्छ खाजगी रुग्णालयात 'कोहनूर हॉस्पिटल' दुसऱ्या क्रमांकावर

स्वच्छता सर्वेक्षण २०२० च्या अहवालानुसार, मुंबई मधील ‘कोहिनूर हॉस्पिटल’ला ‘स्वच्छ खासगी रुग्णालय’ या विभागामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार बहाल केला आहे. मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) स्वच्छता अभियानात मोलाची कामगिरी करणाऱ्या संस्थांसाठी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. कोहिनूर हॉस्पिटलचे कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहल कंसारिया आणि उपाध्यक्ष (VP) अतुल मोडक यांना महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे युवा मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह माजी महापौर स्नेहल आंबेकर, अभनेत्री दीपाली सय्यद आणि इतर मान्यवर देखील उपस्थित होते.

१० वा वर्धापन दिन

कोहिनूर हॉस्पिटलने नेहमीच स्वच्छता, पर्यावरणाचे सरंक्षण आणि संवर्धन या तत्वांचे पालन केले आहे आणि म्हणूनच ‘लीड’ चे प्रमाणपत्र असलेले ‘ग्रीन हॉस्पिटल’ अशी कोहनूर हॉस्पिटलची ओळख आहे. अलीकडेच कोहिनूर हॉस्पिटलने १० वा वर्धापन दिन साजरा केला आणि आता महानगर पालिकेकडून स्वच्छतेसाठी दुसरे मानाकंन प्राप्त झाले. त्यामुळे सध्या कोहिनूर हॉस्पिटल दुहेरी आंनद साजरा करत आहे.

हा आनंद सगळ्यांबरोबर साजरा करण्यासाठी कोहिनूर हॉस्पिटलने ‘स्वास्थ्य सबका’ या उपक्रमाला सुरुवात केली आहे. त्यामध्ये काही खास हेल्थ पॅकेजेस तयार केली आहेत. ज्यामध्ये गुढघा प्रत्यारोपण, मोतीबिंदू अशा शस्त्रक्रिया माफक दारात करून मिळतील. तसेच हेल्थ चेकअप, फीजीओथेरेपी, आहार सल्ला, ओपीडी सल्ला यामध्ये देखील सूट देण्यात आली आहे. या उपक्रमामागे माफक दरामध्ये उत्कृष्ट वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा कोहिनूर हॉस्पिटलचा हेतू आहे.

जेव्हा आपण उपचारासाठी रुग्णालय निवडतो त्यावेळी स्वच्छतेसाठी आग्रही असतो. त्यामुळे रुग्णालय स्वछ राखण्यासाठी रुग्णालयाच्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा तसेच रुग्ण आणि रुग्णालयाला भेट देणाऱ्या प्रत्येकाचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. महानगरपालिकेने केलेल्या सन्मानासाठी संपूर्ण टीम कडून आम्ही आभार व्यक्त करतो तसेच ‘स्वास्थ्य सबका’ या उपक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा यासाठी आवाहन करतो.  – अतुल मोडक; उपाध्यक्ष, कोहिनूर हॉस्पिटल


हेही वाचा – ‘वरळी’ला मिळाला मुंबईतील स्वच्छ वॉर्ड पुरस्कार


 

First Published on: January 23, 2020 3:01 PM
Exit mobile version