मुंबईत विनामास्क व्यक्तींवर कारवाई सुरूच; ४६ लाखांची दंड वसुली

मुंबईत विनामास्क व्यक्तींवर कारवाई सुरूच; ४६ लाखांची दंड वसुली

कोरोना मास्क

मुंबईमध्ये मागील काही दिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाला आळा घालण्याचे पालिका यंत्रणा व आरोग्य खात्याने प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेले नियम न पाळणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी मुंबई पोलीस, रेल्वे प्रशासन आणि पालिका यांनी विनामास्क फिरणाऱ्या २२ हजार ९७६ व्यक्तींवर कारवाई केली. या व्यक्तींकडून तब्बल ४६ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली.

महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि उपनगरातील रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह आणि सार्वजनिक ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. विनामास्क आढळून आल्याने एकूण २२ हजार ९७६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून प्रत्येकी २०० रुपयेप्रमाणे एकूण ४५ लाख ९५ हजार २०० इतकी दंड वसुली करण्यात आली आहे.

महापालिकेच्या २४ विभागांपैकी ‘एल’ विभागात सर्वाधिक म्हणजे ८७५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून १ लाख ७५ हजार रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या खालोखाल ‘आर मध्य’ विभागात ८१९ व्यक्तींकडून रुपये १ लाख ६३ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

First Published on: February 23, 2021 10:44 PM
Exit mobile version