GoodNews! क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना महापालिकेचा Corona बोनस!

GoodNews! क्वारंटाईनसाठी वापरलेल्या हॉटेल्सना महापालिकेचा Corona बोनस!

मुंबईत कोरोना बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याचे आदेश

राज्यात गेल्या काही महिन्यांपूर्वी कोरोनाने अक्षरशः थैमान घातले होते. कोरोना बाधितांवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स, बेड्स कमी पडू लागल्याने महाविद्यालये, शाळा, हॉटेल्स, रेस्टॉरंटसह मोकळ्या मैदानात देखील कोव्हिड वार्ड तयार करण्यात आले होते.  दरम्यान, कोरोना काळात महापालिकेच्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील लोकांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यासाठी महापालिकेने हॉटेलच्या जागा ताब्यात घेतल्या होत्या. त्या सर्व तारांकित आणि बिगर तारांकित अशा एकूण १८२ हॉटेलचा वापर महापालिकेने करुन त्यांचे पैसे अदा केले असल्याची माहिती मिळतेय.

महापालिका हॉटेल्सना कोरोना बोनस देण्याच्या तयारीत

हॉटेलच्या वापराचे पैसे मालकांना दिल्यानंतर त्यांना त्या कालावधीतील मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय प्रशासन घेण्याच्या विचारात आहे. त्यामुळे महापालिका हॉटेल्सना कोरोना बोनस देऊ शकते. तसेच एप्रिल ते जून या कालावधीत हॉटेलच्या मालमत्ता कराचे पैसे वापरकर्ते म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वसूल केले जाणार आहेत.

आयुक्तांनी हॉटेल व्यावसायिकांना ही सवलत देण्यासाठी आरोग्य विभागाच्या खात्यातून करनिर्धारण आणि संकलन विभागाकडे या कराची रक्कम वळती करुन घेण्याचा निर्णय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून २०२० या तीन महिन्याच्या कालावधीत या सर्व हॉटेलची मालमत्ता कराची रक्कम २२ कोटी ७० लाख रुपये एवढी आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक मालमत्ता कराची जी रक्कम महापालिकेला भरणे अपेक्षित आहे. ती रक्कम महापालिका स्वतःच भरणार असल्याचे सांगितले जात आहे.


ST प्रशासनाची धाकधूक वाढली; मुंबईतून परतलेले सांगलीतील १०६ कर्मचारी पॉझिटिव्ह

First Published on: October 27, 2020 11:31 AM
Exit mobile version