‘स्पेशल २६’ ची कॉपी अंगलट; १३ जणांना अटक

‘स्पेशल २६’ ची कॉपी अंगलट; १३ जणांना अटक

छायाचित्र प्रतीकात्मक (आंतरजालातून साभार)

‘स्पेशल २६’ चित्रपटात अक्षय कुमार आणि अनुपम खेर यांनी साकारलेले पात्र आयकर अधिकारी बनून लोकांची करतात. याच पद्धतीने मुंबईत आयकर अधिकारी बनून आलेल्या १३ जणांच्या टोळीने एका व्यापाऱ्याला ८० लाख रुपयांचा चुना लावलायचा प्रकार दहिसर येथे उघडकीस आला. दहिसर पोलिसांनी सीसीटीव्ही तसेच तांत्रिक तपास करून या १३ तोतया आयकर अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. अटक कऱण्यात आलेले सर्व जण पश्चिम उपनगरात राहणारे असून त्यापैकी काहीजण रिक्षा चालक, वाहन चालक असून महिला गृहिणी आहेत.

दहिसर पूर्व येथे राहणारे किसन बेलवटे (५९) या व्यापाऱ्याच्या घरी ८ जून रोजी दुपारच्या सुमारास १० ते १२ इसम सुटाबुटात आले व त्यांनी आयकर अधिकारी असल्याचे सांगून त्याच्या जवळील आयकर विभागाचे ओळखपत्र दाखवून घरात प्रवेश केला.

घर झडती घेण्याच्या निमित्ताने त्यांनी बेलवटे यांच्याघरातील ८० लक्ष रुपयाची रोकड आणि मोबाईल फोन घेऊन चौकशीसाठी कार्यालयात या असे सांगून निघून गेले. बेलवटे याना संशय येताच त्यांनी त्याच्या ओळखीचे एका व्यापारी यांच्याकडे संपर्क साधला. त्यांनी बेलवटे याना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा सल्ला दिला.

बेलवटे यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासावरून या टोळीचा शोध घेऊन बुधवारी १३ जणांना अटक कऱण्यात आली अटक करण्यात आलेल्यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे.

First Published on: June 15, 2019 11:08 AM
Exit mobile version