प्रीती – नेस छेडछाड प्रकरणावर कोर्टाकडून कायमचा पडदा

प्रीती – नेस छेडछाड प्रकरणावर कोर्टाकडून कायमचा पडदा

प्रीती झिंटा आणि नेस वाडिया (सौजन्य-इंडियन एक्सप्रेस)

मुंबई हाय कोर्टाने प्रीती झिंटा आणि नेस वाडिया यांचे प्रकरण रद्द केले आहे. प्रीती झिंटाने नेस वाडियाव छेडछाडीचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर आता कायमचा पडदा पडला आहे. तसेच प्रीती आणि नेस या दोघांनाही या संबंधी मीडियाशी बोलण्यास कोर्टाने नकार दिला आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने २०१४ साली नेस वाडिया विरोधत छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी १ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनवणीत मुंबई हाय कोर्टाने अभिनेत्री प्रीती झिंटा आणि उद्योगपती नेस वाडिया यांना २०१४ चे प्रकरण कोर्टाबाहेरच मिटवण्याचा सल्ला दिला होता. ३० मे २०१४ साली इंडियन प्रिमियर लीगच्यमा सामन्यांच्या दरम्यान वानखेडे स्टेडियमवर या प्रकरणाची सुरुवात झाली होती. नेस आणि प्रीती हे किंग्ज इलेव्हन पंजाब या आयपीएलमधील टीमचे सहमालक होते.

आयपीएल लीगमध्ये झालेली छेडछाड 

दाखल केलेल्या तक्रारीनुसार, वाडिया हे तिकिट वाटण्याच्या मुद्द्यावरून टीमशी बोलताना अपशब्द वापरत होते. त्यावेळी त्यांनी टीम विजयाच्या वाटेवर होती. दरम्यान, प्रीतीने नेसला शांत राहण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी त्याने प्रीतीवर देखील आगपाघड केली. तिचा हात धरून अपशब्दाचा वापर केला. या वर्षी फेब्रुवारीच्या महिन्यात पोलिसांनी नेस वाडियाच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. मात्र नेस यांनी आरोपाचे खंडन करत हाय कोर्टात याचिका दाखल केली.

First Published on: October 10, 2018 6:50 PM
Exit mobile version