अलिबागहून आलास का? वर बंदी नाही

अलिबागहून आलास का? वर बंदी नाही

मुंबई उच्च न्यायालय

‘सर्वच समुदायावर विनोद होत असतात. त्यामुळे ते फारसे मनावर घ्यायचे नसतात,’ असे नमूद करत मुंबई हायकोर्टाने “काय रे, अलिबागवरून आलास का?”, या डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी याचिका फेटाळून लावली आहे. मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने आज हा निर्णय दिला.

हेही वाचा – खूशखबर! मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे!

म्हणून डायलॉगवर बंदी नाही

‘अलिबाग से आया है क्या?’ किंवा ‘अलिबागहून आलास का?’ हे डायलॉग ‘अपमानजनक’ असल्याच्या भावनेने अलिबागमधील सातीर्जे या गावातील रहिवासी राजेंद्र ठाकूर यांनी अॅड. रघुराज देशपांडे यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सिनेमा, नाटके, टीव्ही मालिका तसेच स्टॅण्डअप कॉमेडीमध्ये या डायलॉगचा सर्सास वापर करण्यास बंदी घालावी, अशी विनंती या याचिकेद्वारे केली होती. त्यावर मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग आणि न्या. जामदार यांच्या खंडपीठाने आज निर्णय दिला. सर्वच समुदायावर विनोद होत असतात. ते मनावर घेऊ नयेत. असा निवाडा करत हायकोर्टाने राजेंद्र ठाकूर यांची ‘अलिबागहून आलास का?’ या डायलॉगवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावली.

First Published on: July 19, 2019 5:35 PM
Exit mobile version