बीएमए पुरस्कारामध्ये वेलिंगकर इन्स्टिट्यूटचा सन्मान

बीएमए पुरस्कारामध्ये वेलिंगकर इन्स्टिट्यूटचा सन्मान

बीएमए पुरस्कारामध्ये वेलिंगकर इन्स्टिट्यूटचा सन्मान

एस. पी. मंडळीच्या प्रि. एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या (वीस्कूल) शिरपेचात मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नुकत्याच झालेल्या ४० व्या बीएमएमध्ये (बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन) मानाचा तुरा रोवला गेला. वीस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी दोन सन्मान मिळवत वीस्कूलची शान आणखी उंचावली आहे. बीएमएद्वारे दरवर्षी व्यवस्थापन क्षेत्रासाठी सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार दिला जातो. यावर्षी पीजीडीएम बॅच २०१७- २०१९ च्या अलिशा माहेश्वरी, पीजीडीएम रिसर्च आणि बिझनेस अनालिटिक्स बॅच २०१७-२०१९च्या स्वेता बासू यांनी ग्लोबल रिसर्च अलायन्सचे अध्यक्ष डॉ. आर. ए. माशेलकर यांच्या हस्ते सर्वोत्तम विद्यार्थी पुरस्कार मिळवले. शैक्षणिक पुरस्कार परीक्षकांनीही बीस्कूलचा २०१७-१८ वर्षात व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रात दर्शवलेल्या असामान्य कामगिरीसाठी सन्मान केला. हा पुरस्कार ‘परीक्षकांतर्फे खास उल्लेख’ विभागाअंतर्गत देण्यात आला.

सर्वोत्तम विद्यार्थ्यांची अशी केली निवड

सर्वोत्तम विद्यार्थी विभागाच्या विजेत्यांची निवड करताना परीक्षकांनी शैक्षणिक कामगिरी, अभ्यासाव्यतिरिक्त उपक्रम, विद्यार्थी कक्ष किंवा समितीमधील भूमिका, सीएसआर, प्लेसमेंटपूर्व प्रस्ताव, स्वयंविकास आणि उन्हाळी प्रकल्प इत्यादी बाबी विचारात घेतल्या. विद्यार्थ्यांना एक मध्यवर्ती संकल्पना देत त्याविषयी त्यांचा दृष्टीकोन मांडण्यास सांगण्यात आले. यंदा भारतीय व्यवसायातील परिस्थितीमध्ये बदल २०१०- ३० ही संकल्पना देण्यात आली होती.

‘अडथळ्यांवर मात करत प्रगती’

४० व्या बीएमए पुरस्कार सोहळ्यात वीस्कूलचे समूह संचालक प्रो. डॉ. उदय साळुंखे म्हणाले, ‘व्यवस्थापन शिक्षण क्षेत्रातील असामान्य कामगिरीसाठी ‘परीक्षकांतर्फे खास उल्लेख’ शैक्षणिक पुरस्कार मिळाल्याचा वीस्कूलला सन्मान वाटतो. मी वीस्कूलच्या विद्यार्थिनी अलिशा माहेश्वरी आणि स्वेता बासू यांचे या प्रतिष्ठित औद्योगिक व्यासपीठावर व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांमध्ये सहभाग झाल्याबद्दल अभिनंदन करतो. देशातील स्त्रिया विविध क्षेत्रांत प्रगती करताना वेगवेगळे अडथळे पार करत उंची गाठत आहेत. या सहभागाबद्दल वीस्कूलला अतिशय अभिमान वाटतो. सध्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये नाविन्य आणि चपलता अतिशय गरजेचे झाले आहे. हे लक्षात घेता उद्याचे नेते घडवण्यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सर्वोच्च उद्दिष्ट ठेवण्यासाठी मार्गदर्शन करतो.’

First Published on: March 19, 2019 9:44 PM
Exit mobile version