booster dose : टास्क फोर्स आणि राज्य शासनाने बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी- पालिका

booster dose : टास्क फोर्स आणि राज्य शासनाने बूस्टर डोससाठी केंद्राकडे शिफारस करावी- पालिका

टास्क फोर्सच्या बैठकीत आज कोरोनाविरोधी लसीचा बूस्टर डोस देण्यासंदर्भात चर्चा झाली. टास्क फोर्स आणि राज्य सरकारने बूस्टर डोस संदर्भात केंद्राकडे शिफारस करावी अशी भूमिका मुंबई महानगरपालिकेने घेतली आहे. तसेच लहान मुलांच्या लसीकरणाबाबतही आज चर्चा झाली. यावेळी पालिकेने लहान मुलांच्या लसीकरणा संदर्भात मार्गदर्शक सुचना नाहीत, सुचना येताच प्रशिक्षित स्टाफकडून लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्याविषयी निर्णय घेऊ असे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्यात आता लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. दरम्यान मुंबईकरांना बूस्टर डोस देण्यासंदर्भात पालिका एक सर्व्हे करणार आहे. या सर्व्हेच्या आधारे मुंबईकरांना बूस्टर डोस द्यायचा की नाही हे स्पष्ट होईल.

यात मुंबई महानगरपालिकेने तीन लाख मुलांच्या लसीकरणासाठी तयारी सुरु केली असून टास्क फोर्सच्या सूचनेनंतर पुढील योजना आखली जाईल.

परंतु राज्यात अजून लहान मुलांच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आधी लहान मुलांचे लसीकरण सुरु करत शाळा सुरु कराव्यात असा आग्रह आहे. दरम्यान लहान मुलांवरील कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही, त्यामुळे अनेक लहान मुले अद्याप शाळेत गेले नाहीत. अशा परिस्थितीत पेडियाट्रिक लसीकरण लवकरात लवकर सुरु करा असा सल्ला टास्क फोर्सने दिलाय.


 

First Published on: November 23, 2021 4:50 PM
Exit mobile version