Breaking – क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग!

Breaking – क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग!

मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशामन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या क्रॉफर्ड मार्केटमधून लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाहीये. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे.

या आगीत कोणतंही जीवितहानी झालेली नाही. तसंच कुणालाही इजा झाल्याचं वृत्त अद्याप नाही. संध्याकाळी ६.१५ च्या सुमारास महात्मा फुले मार्केटला ही आग लागली आहे. कपड्याच्या काही दुकानांना आग लागली. चार गाळ्यांना आग लागली. फायर चीफ प्रभात रहांगदळे यांनी याबाबत माहिती दिली. आग नियंत्रणात आणणं सुरु आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.

First Published on: June 11, 2020 6:58 PM
Exit mobile version