घाटकोपर पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बंद; मोठी वाहतूक कोंडी

घाटकोपर पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल बंद; मोठी वाहतूक कोंडी

घाटकोपर पूर्वेकडील पूल

घाटकोपर पूर्व-पश्चिमेला जोडणारा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. पूल धोकादायक असल्यामुळे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र अचानक पूलावरील वाहतूक बंद केल्यामुळे घाटकोपरमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मनपाच्या अजब कारभारामुळे घाटकोपरमध्ये हजारो गाड्या अडकल्या आहेत. महत्वाचे म्हणजे एलबीएस मार्गावर आधीच मेट्रोचे काम सुरु असल्यामुळे या भागामध्ये मोठी वाहतूक कोंडी होत असते आणि आता पूर्व-पश्चिमला जोडणारा पूल बंद केल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे.

अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आल्याने या भागातील मोठ्याप्रमाणात वाहनांची कोंडी निर्माण झाली आहे. हा पूल धोकादायक ठरल्याने, प्रशासनाने कोणत्याही प्रकारची पर्यायी व्यवस्था न करता बंद केल्यामुळे शुक्रवारी संध्याकाळी नित्यानंदनगर परिसरात लिंक रोडवर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. हा पूल अचानक बंद केल्यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे.

अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवरील पूल धोकादायक ठरल्याने शुक्रवारी अचानक वाहतुकीसाठी बंंद करण्यात आला. त्यामुळे या भागातील वाहतुकीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिका सभागृहामध्ये स्थानिक नगरसेविका व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, पर्यायी व्यवस्था न करता पूल बंद कसा केला असा सवाल उपस्थित केला. अंधेरी-घाटकोपर लिंक रोडवर जाण्यासाठी हा पूल महत्वाचे आहे. २०१४ पासून या पुलाचा प्रश्न उपस्थित झाला होता. तेव्हापासून या पुलाच्या बांधणीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. परंतु आता ते पूल बंद केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. या पुलाची दुरुस्ती व्हायला हवी. परंतु हा पूल बंद करताना पर्यायी वाहतूकीची व्यवस्था व्हायला हवी होती. परंतु ते न केल्यामुळे लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

या पुलावरील अवजड वाहनांना बंदी करण्यात यावी. आणि हलक्या गाड्यांसाठी हे पूल सुरु करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे.जेणेकरून वाहतूकीची कोंडी या भागात निर्माण होणार नाही,अशी मागणी राखी जाधव यांनी केली आहे. चार महिन्यांकरता पर्यायी मार्ग ठेवला जावू शकतो,असेही त्यांनी स्पष्ट केले.

First Published on: May 31, 2019 8:42 PM
Exit mobile version