बेस्टला बिल्डरांचा ३२० कोटींचा चुना

बेस्टला बिल्डरांचा ३२० कोटींचा चुना

प्रातिनिधिक चित्र

मागील १० वर्षांपासून मुंबईतील प्रसिद्ध बिल्डरांवर बेस्ट उपक्रमांचे ३२० कोटी रुपये थकीत असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. त्यामुळे पुन्हा एकदा बेस्ट प्रशासनाच्या कारभाराचे लेखा परिक्षकांच्या पत्राने चांगले वाभाडे काढले आहे. बेस्ट उपक्रमाची बस स्थानके, बस आगार वाणिज्यदृष्ट्या विकसित करण्याच्या अनुषंगाने विविध खाजगी व्यवसाय संस्थांना कंत्राट देण्यात आले होते. हा कंत्राटाचे लेखापरीक्षण करताना असे निदर्शनात आले की, बिल्डरांकडून बेस्ट उपक्रमाला 320.09 कोटी एवढ्या रकमेचा महसूल येणे शिल्लक आहे.

या संदर्भात १८ मे २०१७ रोजी तत्कालीन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांच्या दालनात संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर याविषयाबाबत कोणताही आढावा घेण्यात आलेला नाही. महापालिकेच्या मुख्य लेखापरिक्षकांनी या थकीत ३२० कोटी रुपयांची बिल्डरांकडून वसूल करण्यात यावी यासाठी बैठक आयोजित करण्याचे आदेश दिले आहे. बेस्ट गेल्या काही वर्षांत आर्थिक तोट्यात आहे. बेस्ट उपक्रम २१०० कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. बेस्टवर सध्या १८९० कोटी रुपयांचे कर्ज आहे. बेस्ट उपक्रम टिकून ठेवण्यासाठी बेस्ट प्रशासन सर्व प्रकारच्या युक्त्या लढवत आहे. त्यामुळे कर्मचारी आणि अधिकार्‍यांचे प्रमोशन आणि ग्रेजावटी मिळणेसुद्धा बंद झाले आहे.

या थकबाकी विषयी आम्ही वारंवार बेस्ट महाव्यवस्थापकांच्या निदर्शनात आणू दिलेल्या आहे. मात्र बेस्ट प्रशासन यावर आजपर्यत कारवाई केली गेली नाही. बीएसटीला चचनभासत असताना बिल्डरांकडून पैसे वसूल करण्या ऐवजी बेस्ट मध्ये काटकसरी योजना आणून बेस्टला रुळावरून खाली आण्याच काम बेस्ट महाव्यवस्थापकांनी केला आहे.                     -सुनील गणाचार्य, बेस्ट समिती सदस्य

बिल्डरांवर बेस्ट उपक्रमांचे ३२० कोटी रुपये थकबाकीबाबत परिपूर्ण अहवाल मी मागितला आहे. तो अहवाल येताच यावर बोलणे शक्य होईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.
– आशिष चेंबूरकर,बेस्ट समिती अध्यक्ष

First Published on: July 23, 2018 5:20 PM
Exit mobile version