ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पलटी होऊन एकाचा मृत्यू

ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पलटी होऊन एकाचा मृत्यू

ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्डात कार पलटी होऊन एकाचा मृत्यू

ठाण्यातील घोडबंदरजवळ ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. घोडबंदर रोडवरील मुल्ला बांग डेपोजवळ ही घटना घडली. या अपघातामध्ये सचिन काकोडेकर यांचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात झाला.

सचिन कोकाडकर हे अर्टिका गाडीने निलकंठ ग्रीन्स येथून घोडबंदर रोडकडे जात होते. मुल्ला बाग बस डेपोजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये त्यांची कार पलटी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे कर्मचारी, इर्मजन्सी टेंडर, रेस्कयू वाहन आणि हायड्रासह सर्व जन घटनास्थळी आले. घटनास्थळी हायड्राच्या सहाय्याने अर्टीका कारला खड्यातून बाहेर काढण्यात आली. जखमी सचिन काकोडकर यांना गाडीतून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातामध्ये मृत्यू झालेले सचिन काकोडकर हे घोडबंदर रोड येथे राहणारे होते. जखमी अवस्थेत त्यांना बेथनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. इगल कंस्ट्रक्शनद्वारे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी हे खड्डे खोदण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे

First Published on: May 15, 2019 12:47 PM
Exit mobile version