फसवणुकीप्रकरणी दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक

फसवणुकीप्रकरणी दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक

फसवणुकीप्रकरणी दिलीप छाब्रियाच्या बहिणीला अटक

बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी डिसी डिझाईनचे संस्थापक आणि प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रियाची बहिण कंचन छाब्रिया हिला गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. याच गुन्ह्यांत एक पॉश आणि महागडी कार पोलिसांनी जप्त केली आहे. नरिमन पॉईट परिसरात एक बोगस नंबर प्लेट असलेली महागडी स्पोर्टस कार येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र तिथे कुठलीही स्पोटर्स कार आली नाही, दुसर्‍या दिवशी पोलिसांनी ताज हॉटेल परिसरातून एक कार जप्त केली होती. या कारची नंबर प्लेट तसेच चेसिंग क्रमांक बोगस होता. ही कार दिलीप छाब्रिया याने डिझाईन केली होती. बोगस दस्तावेज सादर करुन एका खाजगी वित्तसंस्थेकडून या कारसाठी ४२ लाख रुपयांचे लोन घेण्यात आले होते.

या गुन्ह्यांत दिलीपसह इतर आरोपींचा सहभाग उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी बोगस दस्तावेज बनवून फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत २८ डिसेंबरला दिलीप छाब्रिया याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस तपासात दिलीपने कॉमेडी अभिनेता कपिल शर्मासह इतरांची अशाच प्रकारे फसवणुक केली होती. कारसह व्हॅनिटी बस डिझाईन करुन देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून अनेकांची फसवणुक झाली होती. अशीच एक तक्रार कपिल शर्माकडून वर्सोवा पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

First Published on: January 27, 2021 10:11 PM
Exit mobile version