रेल्वे नियमाची जनजागृती करणारा कार्टुन

रेल्वे नियमाची जनजागृती करणारा  कार्टुन

चर्चगेट स्थानकापासून सुरू झाला उपक्रम

रेल्वे नियमांविषयी प्रवाशांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी अणि सुरक्षित प्रवासासाठी अनेक नवनवीन उपक्रम रेल्वेकडून राबवली जात असतात. अशाच प्रकारे पश्चिम रेल्वेने ‘डब्लू आर’ कॉर्टूनचा पेहराव केलेला व्यक्ती चर्चगेट स्थानकावर उभ्या करून त्या रेल्वे नियमांविषयी प्रवाशांमध्ये जागृती निर्माण करत आहेत. रेल्वे प्रवासी या कॉर्टूनसोबत सेल्फी काढतात आणि रेल्वे नियमांचे पालन करू, असे वचनही देतात.

रेल्वेमध्ये नवीन येणारे तंत्रज्ञान, अ‍ॅप याबद्दल प्रवाशांना माहिती करून देण्याचे कामदेखील ‘डब्लू आर’कडून करण्यात येत आहे. यासह सुरक्षित प्रवास, रेल्वे नियम याविषयी माहिती दिली जाते. कॉर्टूनकडून माहिती ऐकण्यास प्रवासी उत्सूक असतात. या कॉर्टूनसोबत अनेक प्रवाशांनी चर्चा करून सेल्फी काढले. प्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि पश्चिम रेल्वेच्या सोशल मीडियासोबत प्रवासी जोडण्यासाठी ही योजना आखण्यात आली आहे. अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

सोशल मिडियातून मोहीम होतेय व्हायरल
प्रवासी सेल्फी काढून (@WesternRly) असा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर त्यांचा फोटो अपलोड केला जात आहे. ज्या प्रवाशांचा सेल्फी उत्तम असेल, त्याला बक्षीस घोषित करण्यात येणार असल्याची घोषणा पश्चिम रेल्वे प्रशासनाने केली आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये कॉर्टूनसोबत सेल्फी काढण्यास ओळ लागली आहे.

First Published on: March 27, 2019 4:39 AM
Exit mobile version