कार्टूनबरोबर सर्जिकल स्ट्राईक गनला मागणी

कार्टूनबरोबर सर्जिकल स्ट्राईक गनला मागणी

SERGICAL STRIKE GUN

होळी-धुळवडीसाठी विविध प्रकारच्या पिचकार्‍या आणि रंगांनी बाजार फुलले आहेत. बुधवारी होणार्‍या होळीसाठी बच्चेकंपनीसोबत त्यांच्या पालकांची रंग व पिचकार्‍या खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. मात्र यातही बच्चे कंपनीचा सर्वाधिक कल हा डोरेमॉन, छोटा भीम, मिकी माऊस, टॉम अ‍ॅण्ड जेेरी, निंजा, सिंचान, मोटू-पतलू यासारख्या पिचकार्‍यांना मोठी मागणी आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचाही प्रभाव होळीवर दिसून येत आहे. सर्जिकल स्ट्राईक गनलाही बच्चे कंपनीचा मोठ्या प्रमाणात पसंती आहे.

दरवर्षी होळी-धुळवडीसाठी बच्चे कंपनीकडून त्यांच्या आवडत्या कार्टूनच्या पिचकारीला पसंती असते. टॉम अ‍ॅण्ड जेरी, छोटा भीम, मिकी माऊस, निंजा, सिंचान, मोटू पतलू या कार्टूनच्या पिचकार्‍यांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पसंती असते. यावर्षीही कार्टून्सच्या पिचकारीला बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणात पसंती दिसून येत आहे. कार्टून्सला असलेली पसंती पाहून पिचकारीवरील कार्टून्सच्या चित्राबरोबरच यावर्षी कार्टून्सच्या आकाराच्या पिचकार्‍याही बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे उरी दहशतवादी हल्ला व पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा प्रभावही होळीमध्ये दिसून येत आहेत. बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सर्जिकल स्ट्राईक गन आल्या आहेत. सर्जिकल स्ट्राईक गनचा आकार मोठा व जबरदस्त असल्याने त्याच्या खरेदीकडे बच्चे कंपनीचा कल दिसून येत आहेत. सर्जिकल स्ट्राईक गनला टँक जोडलेला असल्याने बच्चे कंपनीसाठी ही गन आवडीची ठरत आहे. कार्टून्स व सर्जिकल स्ट्राईक गनच्या पिचकार्‍या साधारण 250 ते 300 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. त्यामुळे पिचकारी खरेदी करताना पालकांच्या खिशाला चांगलीच चाट पडत आहे.

पिचकार्‍यांच्या किंमतीमध्ये वाढ
विविध आकाराच्या व रंगाच्या पिचकार्‍या बाजारात आल्या असल्या तरी त्यांच्या किंमतीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली असल्याचे पिचकारी विक्रेते पाडुंरंग सरवदे यांनी सांगितले. गेल्यावर्षी कार्टून्सच्या पिचकार्‍या 220 ते 230 रुपयांपर्यंत होत्या यावर्षी त्यांची किंमत 250 व त्यापेक्षा अधिक आहेत. असेही सरवदे यांनी सांगितले.

खुल्या रंगासह आकर्षक पँकिंगमध्ये रंग
रासायनिक रंगांवर बंदी आणल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक रंग उपलब्ध झाले होते. दरवर्षी खुले रंग मिळत असे परंतु यावर्षी काही कंपन्यांनी तीन किंवा पाच रंगांचे पॅकेट बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. आकर्षक पॅकिंगमधील हे रंग 150 रुपयांना उपलब्ध आहेत.

First Published on: March 19, 2019 4:59 AM
Exit mobile version