सीसीटीव्हीमुळे २१ घरफोड्या करणारा आरोपी गजाआड

सीसीटीव्हीमुळे २१ घरफोड्या करणारा आरोपी गजाआड

मीरा-भायंदर परिसरामध्ये भरदिवसा होणार्‍या घरफोड्यांनी नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेली होती. दरम्यान गुन्हेगार मात्र सापडत नसल्याने पोलिसांना अज्ञात आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात येत होते. या घरफोड्यांना आला घालण्याच्या वरिष्ठांच्या आदेशाने अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मोहीम हाती घेतली आणि विविध भागात तब्बल २१ घरफोड्या करून पोबारा करणार्‍या आरोपीला अखेर पोलिसांनी १०३० ग्राम सोन्याच्या ऐवजांसह एकूण ३६ लाख २० हजाराच्या मुद्देमालासह आरोपी राजेंद्र रमेश पटेल वय (३७} याला अटक केली. चोरलेल्या मालाची विल्हेवाट लावणारा साथीदार रोहीत बाळकृष्ण रेशीम (३०)हा मात्र नवघर पोलिसांच्या कस्टडीत आहे. त्यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येण्याची शक्यता आहे.

17 डिसेंबरला अंधेरी रेल्वे स्टेशन बाहेर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची पाहणी करीत असताना पोहवा. जाधव व पोना. सचिन सावंत यांना आपल्याला पाहिजे असलेला इसम नेहमीची सॅक बॅग पाठिला लावून रेल्वे स्टेशनमधून बाहेर येवून पायी चालत जात असल्याचे दिसला. पोना सचिन सावंत व पोहवा जाधव यांची खात्री झाली की, आपल्याला पाहिजे असलेला संशयित इसम हा तोच असून तो बाईकवर बसत असतानाच पाठी मागून पळत जावून दोघांनी फिल्मी स्टाईलने संशयित इसमास पकडले. त्यानंतर सदर इसमास विचारपूस केली असता त्याने आपले नांव राजेंद्र रमेश पटेल असे सांगितले. त्याची तपासणी केली असता त्याचे सॅक बॅगमध्ये घरफोडी करण्याची हत्यारे मिळून आली. त्यास अधिक चौकशी करता त्याने मिरा भाईंदर परिसरात केलेल्या गुन्हयांची कबुली दिली.

First Published on: December 25, 2019 2:08 AM
Exit mobile version