बोरीवली दहीहंडी : ‘अप्सरा’ अवतरल्या मंचावर

बोरीवली दहीहंडी : ‘अप्सरा’ अवतरल्या मंचावर

मुंबईमध्ये आज सकाळपासूनच दही हंडीचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. एकीकडे गोविंदा पथकांची हंडी फोडण्याची चढाओढ सुरु असताना दुसरीकडे तमाम गोविंदांचं मनोरंजन करण्यासाठी सेलिब्रिटीजनीही कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या प्रसिद्ध दहीहंडी उत्सवांपैकी एक म्हणजे शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आयोजित दहीहंडी उत्सव. बोरीवली पूर्वच्या मागाठणे मतदार संघात मोठ्या जल्लोषात या हंडीचे आयोजन केले जाते. सुर्वे यांची हंडी सेलिब्रीटी हंडी म्हणूनही प्रसिद्ध आहे. दरवर्षी अनेक तारे-तारका याठिकाणी हजेरी लावून गोविंदांचे मनोरंजन करतात. यंदाही सकाळपासूनच या ठिकाणी अनेक अप्सरांनी हजेरी लावली आहे. यामध्ये अभिनेत्री रविना टंडन, मुग्धा गोडसे, श्रुती मराठे, तेजा देवकर आणि रश्मी देसाई या अभिनेत्रींचा समावेश असून, त्यांनी हंडीच्या कार्यक्रमाला चार चांद लावले. कुणी गाणं गात तर कुणी नृत्याविष्कार सादर करत गोविंदांसह उपस्थितांचं चांगलच मनोरंजन केल्याचं या व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळत आहे. एक नजर टाकूया या व्हिडिओंवर :

अभिनेत्री रविना टंडन


अभिनेत्री श्रुती मराठे

 

अभिनेत्री मुग्धा गोडसे


अभिनेत्री, नृत्यांगना तेजा देवकर

अभिनेत्री रश्मी देसाई

First Published on: September 3, 2018 3:49 PM
Exit mobile version