धक्कादायक! मोबाईलसकट मालकालाही ट्रेन बाहेर खेचले; अंधेरीतील घटना

धक्कादायक! मोबाईलसकट मालकालाही ट्रेन बाहेर खेचले; अंधेरीतील घटना

मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर मोबाईल चोरांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. अशीच एक धक्कादायक घटना अंधेरीमध्ये घडल्याचे समोर आले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार; मोबाईल चोरांने एका ३२ वर्षीय तरुणाला धावत्या ट्रेनमधून बाहेर खेचले. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. संतोष कुमार मौर्य असे या जखमी तरुणाचे नाव असून प्रत्यक्षदर्शींनी मोबाईल चोराला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

नेमके काय घडले?

नालासोपारा येथे राहणारा संतोष कुमार अंधेरी स्थानकाजवळ उतरला आणि त्यांनी विलेपार्ल्याला जाण्यासाठी स्लो लोकल पकडली. तसेच लोकलचा डब्बा पूर्ण भरलेला होता. दरम्यान, ‘मी दोन्ही हातांनी वरचे हँडल पकडलेले होते. तितक्यात डब्ब्यातील एक प्रवासी मोबाइल चोर म्हणून ओरडला. मी लगेच माझे खिस्से तपासले. माझा मोबाइल गायब होता. मी लगेच त्या चोराच्या कॉलरला पकडले. पण, त्याने धावत्या लोकलमधून बाहेर उडी मारली आणि सोबत मलाही खेचले. माझा तोंड प्लॅटफॉर्मवर आपटले’, अशी माहिती संतोष कुमार यांनी दिली. मात्र, मोबाइल चोर पळत असताना सहप्रवाशांनी चोर चोर म्हणून आरडाओरडा केला. त्यामुळे प्लॅटफॉर्मवरील अन्य प्रवाशांनी पाठलाग करुन त्याला पकडले आहे.


हेही वाचा – मुंबईतील GST भवनाला भीषण आग; उपमुख्यमंत्री अजित पवार घटनास्थळी रवाना


 

First Published on: February 17, 2020 3:56 PM
Exit mobile version