वसईत शवविच्छेदनगृहाची दुरवस्था

वसईत शवविच्छेदनगृहाची दुरवस्था

छपरावरील पत्रे तुटले आहेत. पंखे नादुरुस्त झाले आहेत. जनरेटरची सोय नसल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर होणारा त्रास असा अनेक मरण यातना नवघर माणिकपूर शहरातील वसई विरार महापालिकेच्या शवविच्छेदन केंद्र भोगत आहे.

येथील शवविच्छेदन केंद्रात विच्छेदनासाठी अनेक मृतदेह आणले जातात. मात्र, शवविच्छेदनगृहाची इमारत जीर्ण झाली आहे. इमारतीचे खांब अनेक ठिकाणी तुटले आहेत. जुनाट झाडांच्या फांद्या तुटून छपरावर पडल्याने छपरावरील पत्रे तुटलेले आहेत. पंखे नादुरुस्त झाले आहेत. जनरेटर नसल्याने मृतदेह दुसर्‍या ठिकणच्या शवागृहात न्यावे लागत आहेत. अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्यास शवविच्छेदन करणे जिकीरीचे होऊन बसते. पावसाळ्यात तर याठिकाणी गळक्या छपरातून पाणी गळत असते.

शवविच्छेदनगृहाची इमारत मोडकळीच्या स्थितीत असल्याने याठिकाणी डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना नेहमीच जीव मुठीत धरून काम करावे लागत असते. मृतदेहांची विटंबना थांबवण्यासाठी शवविच्छेदन गृहाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या वसई विरार जिल्हाध्यक्षा प्रवीणा चौधरी आणि वसई शहर अध्यक्षा रोहिणी कोचरेकर यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. वेळीच कार्यवाही झाली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

First Published on: December 17, 2019 1:01 AM
Exit mobile version