आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, केंद्र सरकार करणार समीर वानखेडेंवर कारवाई?

आर्यन खान ड्रग्ज प्रकरण, केंद्र सरकार करणार समीर वानखेडेंवर कारवाई?

क्रूझ ड्रग्ज पार्डी प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. यानंतर प्रकरणातील तपास अधिकारी समीर वानखेडे यांनी तपास योग्य केल्याने त्यांच्यावर केंद्र सरकारने कारवाई करण्यास सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सक्षम अधिकाऱ्यामार्फत वानखेडे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यास सरकारने सांगितल्याचे समजते आहे.

समीर वानखेडेंच्या बोगस जात प्रमानपत्र प्रकरणात कारवाई सुरू आहे. NCB ने बॉलीवुड अभिनेता शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानला क्रूजवर ड्रग्ज मिळाल्या प्रकरणी क्लीन चीट मिळाली आहे. या प्रकरणात 14 लोकांविरोधा आरोप पत्र दाखल केले आहे. आर्यन खान सह 6 जणांना पुरावे न मिळाल्याने क्लीन चीट मिळाली आहे.

एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांच्या म्हणण्यानुसार आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेच्या टीमने चूक केली. अटकेवेळी समीर वानखेडे या गुन्ह्याचा तपास करत होते. जर एनसीबीकडून चूक झाली नसेल तर एसआयटी तपास आपल्या हातात का घेईल, असे ते म्हणाले.

First Published on: May 27, 2022 5:19 PM
Exit mobile version