मध्य रेल्वेची वाहतूक अखेर सुरळीत

मध्य रेल्वेची वाहतूक अखेर सुरळीत

(फोटो प्रातिनिधिक आहे)

सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हैदराबाद एक्सप्रेसच्या तांत्रिक बिघाडामुळे डाऊन मार्गावरील लोकल गाड्यांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. लोकल पूर्णपणे ठप्प झाल्याने अनेक प्रवाशांना अंबरनाथ – बदलापूर दरम्यान तत्काळत रहावे लागले होते. दरम्यान एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बिघाड दुरुस्त करण्यास घेतला. हा बिघाड दुरुस्त करण्यास दोन तास लागले असून आता मध्य रेल्वेची वाहतूक अखेर सुरळीत झाली आहे. अखेर दोन तासाच्या खोळंब्यानंतर ही वाहतूक सुरु करण्यात आली आहे.

दोन तासांनी वाहतूक पूर्वपदावर

मध्य आणि हार्बर रेल्वेवरील वाहतूक सतत विस्कळीत होत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. शुक्रवारी मध्य रेल्वेवर ओव्हरहेड वायर दुरुस्ती करणारी व्हॅन रुळावरुन घसरल्याने ही स्थिती उद्भवली. तर सायंकाळी कुर्ला स्टेशनजवळ मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. तर आज पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने ऐन सणासुधीच्या काळात प्रवासांचे प्रचंड हाल होताना दिसत आहे. हैदराबाद एक्सप्रेसचा तांत्रिक बिघाड झाल्याने अंबरनाथ – बदलापूर स्थानका दरम्यान वाहतूक ठप्प झाली होती. याचा फटका सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या गाड्यांवर झाला होता. मात्र आता हा बिघाड दुरुस्त झाल्याने दोन तासांनी या मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आली आहे.

First Published on: September 15, 2018 4:35 PM
Exit mobile version