अ‍ॅमेझॉन पार्सलसाठी मरेची बोगी

अ‍ॅमेझॉन पार्सलसाठी मरेची बोगी

मध्य रेल्वेच्या रेल्वे स्थानकांवर अ‍ॅमेझॉनचे पार्सल पीकपॉईंट यशस्वी झाल्यानंतर आता रेल्वे प्रशासनाने पार्सल वाहतुकीसाठी मालगाडीची एक बोगी अ‍ॅमेझॉनसाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वे 6 लाख 10 हजार रुपये महसूल मिळणार आहे.

ऑनलाईन शॉपिंग कंपनीला त्यांच्या गोदामामधून पार्सल रस्ते मार्गाने नेण्यास जादा खर्चिक होते. यासाठी मध्य रेल्वेने ३ महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर अ‍ॅमेझॉन कंपनीबरोबर करार केला आहे. यातून मध्य रेल्वेला 6 लाख रुपयांचा महसूल मिळतो. अ‍ॅमेझॉनचे पार्सल कल्याण ते सीएसएमटी या दरम्यान कोणत्याही स्थानकावर उतरविता येणार नाही. कल्याण स्थानकावर माल डब्यात भरलेली साम्रगी सीएसएमटीलाच उतरविता येणार आहे. यासह ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकावर पिक पॉईट आहेत. यासाठी मध्य रेल्वेने गुरुवारी या कराराला मान्यता दिली असून मध्य रेल्वेच्या आठ डब्यांचा वापर अ‍ॅमेझॉन कंपनी करणार आहे.

अ‍ॅमेझॉनचे भिवंडी येथे हब असून एक टन पार्सलसाठी मध्य रेल्वेतर्फे प्रत्येकी ८४८ रुपये आकारण्यात येणार आहेत. लोकलच्या एका डब्यातून १.३ टन मालाची वाहतूक करता येणार आहे. तसेच प्रायोगिकी तत्वावर तीन महिन्याला मध्य रेल्वेला ६ लाख १० हजार रुपये मिळणार आहे. अ‍ॅमेझॉन कंपनीला आपले पार्सल भिवंडी हबमधून कल्याणला रस्त्यामार्गी आणून त्यानंतर रेल्वेचा वापर करावा लागणार आहे. ही मालवाहतूक कमी गर्दीच्या वेळी म्हणजे सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत करता येणार आहे. असे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले .

First Published on: January 26, 2020 2:42 AM
Exit mobile version