विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने ‘मरे’ची वाहतूक विस्कळीत

बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची सेवा विस्ळीत झाल्याचा प्रकार घडला. विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने सेवा विस्कळीत झाली आहे. विठ्ठलवाडीजवळ पेंटाग्राफ तुटल्याने मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. बदलापूर-सीएसएमटी लोकलला हा अपघात झाल्याने मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या दिशेन जाणाऱ्या सर्व गाड्या विस्कळीत झाल्या. यामुळे, मध्य रेल्वेच्या प्रवाशांची सकाळच्या वेळीस मोठी गैरसोय झाली आहे.

या विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेमुळे चाकारमान्यांना नियोजित वेळेत आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचणे शक्य न झाल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही अनेकदा मध्य रेल्वेवर ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले होते. दरम्यान, कल्याणजवळ ही ओव्हरहेड वायर तुटली ही ओव्हरहेड वायर दोन महिलांवर पडल्यामुळे दोन्ही महिला जखमी झाल्या आहेत.

 

First Published on: July 17, 2019 9:09 AM
Exit mobile version