ऑनलाईंन प्रशिक्षणामुळे रेल्वे कर्मचारी ‘ऑन ट्रॅक’

ऑनलाईंन प्रशिक्षणामुळे रेल्वे कर्मचारी ‘ऑन ट्रॅक’

लोकल गाड्यांची देखभाल

देशव्यापी लॉकडाऊनपासून कोरोना व्हायरस या साथीच्या आजारात मध्य रेल्वे सर्व बाजूंनी लढत आहे. त्यानंतर झालेल्या मागणीनुसार, मध्य रेल्वे राज्य सरकारने निश्चित केलेल्या अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी १५ जून २०२० पासून मध्य रेल्वे मार्गवर  २०० उपनगरी सेवा चालवित येत आहे. त्यामुळे कुर्ला, कळवा आणि सानपाडा ईएमयू कारशेड्स मध्य रेल्वेच्या लोकल गाड्याची  देखभाल करण्यात येत आहे तर ऑनलाईन प्रशिक्षणातून कामगारांना  रिफ्रेश केले  जात आहे.

मध्य रेल्वेच्या ईएमयू कारशेड्स 

कोरोनाच्या संकटात भारतीय रेल्वे सक्रिय भूमिका पार पाडत आहे. मध्य रेल्वे सुद्धा लॉकडाऊन काळात जीवन आवश्यक वस्तूचा पुरविठा करण्यासाठी  रेल्वे गुड्स आणि पार्सल रेल्वे  गाड्या सतत सुरु आहे.  आता राज्य सरकारच्या मागणीनुसार मध्य रेल्वेकडून अत्यावश्यक कर्मचार्‍यांसाठी  २०० उपनगरी लोकल सेवा चालवित येत आहे. या लोकल गाड्यांच्या नियमित  देखभालीचे मध्य रेल्वेच्या  कुर्ला, कळवा आणि सानपाडा  ईएमयू कारशेड्स सुरु आहे. ज्यामध्ये  नियमित अंतराने स्थिर रॅकच्या बॅटरी व्होल्टेज तपासणीसह सुरक्षा आणि संरक्षाची तपासणी केली जाते. १००-५०० मीटर अंतराच्या मुव्हमेंट द्वारे अंडर-गियरचे परीक्षण केले जाते.  दिवे, पंखे, स्विचेस, पीए / पीआयएस (पब्लिक अड्रेस/ इन्फर्मेशन सिस्टीम) यासारख्या प्रवाशांच्या सुविधांची तपासणी आणि लक्ष पुरविले जाते. विविध स्टॅबलिंग साइडिंगवर  स्थिर सर्व  रॅक्सच्या खिडक्या आणि दारे बंद करण्याबरोबर  सीलिंग केली जाते;  सर्व  पंटोग्राफ खाली ठेवले जाते ;  बॅटरी स्विच विलग करण्यात  येतो आणि स्किडसह सुरक्षित केलेले सुरक्षेच्या उद्देशाने आरपीएफकडे दिले जाते.

लोकल गाड्यांची देखभाल

 मान्सून संबंधित पुर्वतयारीची  कामे

या काळात ईएमयू रॅक्समध्ये  पावसाळ्याशी संबंधित तयारीची कामे सुरू करण्यात आली  आणि ईएमयू रॅक्सची  पावसाळ्याशी संबंधित कामे  यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. सर्व ईएमयू रॅकमध्ये मार्गदर्शक तत्त्वांनुसार सेवा तत्परतेसाठी रॅकमध्ये विशेष तपासणीचे वेळापत्रक आणि एक विशेष तपासणी चक्र पूर्ण केले गेले आहे.  ईएमयूवर इलेक्ट्रिक वायपरची तरतूद यासारख्या विश्वसनीयता कृती योजने सारख्या गोष्टींची अंमलबजावणी केली गेली आहे. तसेच ओएचई कर्मचार्‍यांसह एकत्रितपणे एक पॅटो रूफ  आणि मेगरिंग तपासणी चक्र पूर्ण  केले आहे. सर्व ईएमयूच्या डीबीआरचे आणि नंतर बेस इन्सुलेटरचे वॉटर जेटने साफ-सफाई केली गेली. रात्रीच्या वेळी   रेक स्थिर असताना स्वच्छ व सॅनेटाइज केले जातात.

 ऑनलाईन माध्यमातून प्रशिक्षण

मास्क  व सॅनिटायझरचे इनहाऊस उत्पादन

कुर्ला, कळवा आणि सानपाडा कारशेड येथे १५०० लिटर हँड सेनिटायझर आणि हजारो फेस मास्क तेथील कर्मचार्‍यांसाठी इनहाऊस तयार करण्यात आले. तसेच कुर्ला आणि कळवा कारशेड्समध्ये नळाशी थेट संपर्क येऊ नये म्हणून आरओ प्लांटमध्ये पायांनी संचालीत  होणारी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे नळाशी थेट संपर्क होऊ नये यासाठी सानपाडा कारशेडमध्ये आरओ प्लांटमध्ये  लेन्स संचालित पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे.

First Published on: June 25, 2020 7:14 PM
Exit mobile version