मान्सून येतोय; अखंडित सेवा देण्यासाठी मध्यरेल्वे सज्ज

मध्य रेल्वे यंदाच्या मान्सूनसाठी पूर्णपणे सज्ज असल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. मध्य रेल्वे या पावसाळ्यात मुंबई हवामान विभागाकडून नाऊकास्ट या तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. नाऊकास्ट हे सर्वात कमी वेळात नकाश्यासहित हवामानाचा अंदाज दर्शविणारे तंत्रज्ञान आहे.विशेष म्हणजे नाऊकास्ट तीन तासापूर्वीच सर्व माहिती कळणार आहे. नाऊकास्ट कडून माहिती कळताच, पावसाचे पाणी तुंबणाऱ्या ठिकाणी आधीच पंपिंगची सोय करुन ठेवता येईल. त्यामुळे वेळीच पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यास मदत होईल, अशी माहिती मुंबई मध्य रेल्वे विभागातील प्रभारी संजयकुमार पंकज यांनी दिली.
नाऊकास्ट काय काय माहिती देणार-
⦁ पावसाची स्थिती नकाश्या सहित दर्शविणार .
⦁ मुंबई आणि मुंबईच्या आजुबाजूला कुठल्या भागात जास्त पाऊस पडेल.
⦁ पावसाची तीव्रता किती.
⦁ पावसा सोबतच हवामानाचा अंदाज, वाऱ्याचा वेग सुद्धा कळणार.
पावसाळा सुरु झाला की नेहमी, लोकल सेवेवर त्याचा परिणाम दिसून येतो. लोकलच्या रुळांवर पाणी साचणे, लोकलमध्ये तांत्रीक बिघाड निर्माण होणे आणि लोकलचे वेळापत्रक विस्कटने. पावसामुळे रेल्वेला अशा एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी लोकल प्रवाशांचे देखील हाल होतात. मुंबईतील जनता कामाला जाण्यासाठी लोकलचाच जास्त वापर करतात. त्यामुळे लोकलच्या नियमित सेवेत काही बदल झाल्यास त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होतो.
दरवर्षी मान्सूनपुर्वी प्रशासन पावसामुळे होणाऱ्या अडचणींना तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा दावा करतात. पण ऐनवेळी काहीना काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा हा दावा खोटा ठरतो. यावेळी मात्र नाऊकास्टच्या मदतीमुळे प्रशासाचा मान्सुन पूर्व तयारीचा दावा खरा ठरेल का? ते येत्या मान्सूनमध्येच ठरेल.

First Published on: May 26, 2018 12:36 PM
Exit mobile version