मोटरमन संपाने घेतला एकाचा ‘जीव’

मोटरमन संपाने घेतला एकाचा ‘जीव’

मोटरमन संपामुळे रेल्वे फलाटांवर झालेली गर्दी (फाईल फोटो)

ओव्हर टाईम, सिग्नल ओलांडण्यास नोकरीवरुन काढण्याच्या शिक्षेला विरोध करत शुक्रवारी मोटरमननी आंदोलन पुकारलेय या आंदोलनामुळे मध्य रेल्वेच्या अनेक फेऱ्या रद्द झाल्या आणि प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. अनेक फलाट प्रवाशांनी खच्चाखच्च भरले होते. सकाळी ऑफिसला वेळेवर जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा मात्र या गर्दीने जीव घेतला. नेरुळ येथे राहणाऱ्या संतोष कांबळे या तरुणाचा गर्दीमुळे ट्रेनच्या खांबावरुन हात निसटला आणि तो खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

नेमकं काय झालं?

शुक्रवारी सकाळी मोटरमनने आंदोलन सुरु केले. त्यामुळे रेल्वेच्या २०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. प्रवाशांना याबाबत काहीच माहिती नसल्यामुळे लोकांची गर्दी वाढत होती. ट्रेन ३० मिनिटे उशीरा धावत होत्या. याच गर्दीतून संतोष कांबळे (३४) प्रवास करत होता. सकाळी ९.२० वाजताची लोकल त्याने पकडली. ११ च्या सुमारात त्याचा हात निसटला आणि वाशीपुलाजवळ कोसळला. तो बराच वेळ ट्रॅकजवळ पडून होता. रेल्वे पोलिसांना माहिती मिळताच त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पण त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्या आधी त्याला मृत घोषित करण्यात आले.

काहीच दिवसांपूर्वी काढला होता फर्स्ट क्लासचा पास

संतोष चेंबूरमधील एका कापड कंपनीत कामाला होता. त्याचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्याच्या बहिणीने त्याला फर्स्ट क्लासचा पास काढून दिला होता. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्याच्या कुटुंबाने रेल्वेला आणि मोटरमनला जबाबदार ठरवले आहे. संतोषच्या पश्चात आई-वडील आणि एक विवाहित बहीण असा परीवार आहे.

First Published on: August 12, 2018 6:03 PM
Exit mobile version