मध्य रेल्वेने फुकट्यांकडून केला १ कोटी ५० लाखांचा दंड वसूल

मध्य रेल्वेने फुकट्यांकडून केला १ कोटी ५० लाखांचा दंड वसूल

विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना दंड

एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांच्या लोकल प्रवासांवर अद्यापही राज्य सरकारकडून निर्णय झालेला नाही. तर  दुसरीकडे हतबल झालेल्या मुंबईकरांनी लोकल प्रवासासाठी रेल्वेच्या नियमाला आता बायपास देण्याचा सपाटा लावला आहे.  मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून जून ते २० नोव्हेंबरपर्यत   ४३ हजार ५१६ फुकट्यांनी रेल्वे आणि लोकलमधून प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वेने या फुकट्या प्रवाशांवर कारवाईकरत तब्बल १ कोटी ५०  लाख रुपयांच्या दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेची मोठी कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यापासून सर्वसामान्य मुंबईकरांची उपनगरीय लोकल सेवा बंद आहेत. फक्त महिला प्रवाशाबरोबर 17 प्रर्वगातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना लोकल प्रवासाची मुभा आहे. राज्य सरकारने मुंबईकरांना लोकल प्रवासाची परवानगी दिली आहे. तरी सुद्धा रेल्वे आणि राज्य सरकारच्या नियमाला बगल देत बिंधास प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. या फुकट्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने तिकीट तपासणी अभियान सुरु केले होते. वरिष्ठ रेल्वे  अधिकारी आणि तिकिट तपासणी कर्मचार्‍यांच्या पथकाने जून ते २० नोव्हेंबर २०२० या कालावधीत केलेल्या गहन, विशेष आणि नियमित तपासणी दरम्यान एकूण ४३ हजार ५१६ प्रकरणे आढळून आली आणि दंड म्हणून १ कोटी ५० लाख  रुपयांची रक्कम मिळाली. ४३,५१६ पैकी उपनगरी गाड्यांमध्ये  ३९,५१६ प्रकरणे आढळून आली आहेत तर  १ कोटी १० लाख  इतका दंड आणि लांब पल्ल्याच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये ४,००० प्रकरणे आढळून आली आहेत व त्यातून ४० लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आला. या, ४३,५१६ प्रकरणांमध्ये ३६,७५४  प्रकरणे नियमित तिकिट तपासणी मोहीमेमध्ये, ४,६१६ प्रकरणे गहन तिकिट तपासणी मोहीमेमध्ये  आणि २,१४६ प्रकरणे विशेष तिकिट तपासणीच्या मोहीमेमध्ये   आढळून आली आहेत.

First Published on: November 27, 2020 6:37 PM
Exit mobile version