BSE चं नाव ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ करा; बाळा नांदगावकरांची मागणी

BSE चं नाव ‘मुंबई स्टॉक एक्सचेंज’ करा; बाळा नांदगावकरांची मागणी

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि प्रवक्ते बाळासाहेब नांदगावकर यांनी केली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशियातील सर्वात जुने स्टॉक मार्केट असून त्याचे नाव मुंबई स्टॉक एक्सचेंज करा. कारण हे स्टॉक एक्सचेंज महाराष्ट्र आणि देशाचा अभिमान असल्याचे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत विनंती केली आहे. दरम्यान, मनसे Amazon मराठीत करा या मागणीवरुन आक्रमक झाली आहे.

“बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशिया चे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव “मुंबई स्टॉक एक्सचेंज” च असले पाहिजे,” असे ट्विट बाळा नांदगावकर यांनी केले आहे.

Amazon मराठीत करा

मनसेने याआधी Amazon App वर मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी मुंबईभर बॅनर लावले होते. दरम्यान, आता मनसे आक्रमक झाली असून Amazon च्या जाहिरातीचे होर्डिंग फाडले. दिंडोशीमधील मनसैनिकांनी होर्डिंग फाडले. दरम्यान, मंगळवारी मनसे नेते अखिल चित्रे यांनी Amaon चे संस्थापक जेफ बेझॉस यांना पत्र लिहले आहे.

First Published on: December 23, 2020 1:04 PM
Exit mobile version