छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यारोहणाचा सोहळा…; जयंत पाटील यांनी दिली माहिती

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यारोहणाचा सोहळा…; जयंत पाटील यांनी दिली माहिती

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला 6 जून 2023 रोजी तीनशे एकोनपन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या बद्दलची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जयंत पाटील म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाला 6 जून रोजी तीनशे एकोनपन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यारोहणाचा समारंभ भार्गत वर्षामध्ये पहिल्यांदा एक स्वातंत्र राज्य, स्वाभिमानी राज्य निर्माण करण्याच प्रसंग होता. म्हणून आज सगळा महाराष्ट्रातला मराठी माणूस हा छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यारोहणाचा सोहळा हा सर्व ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर 10 जूनला महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रसेला 24 वर्ष पूर्ण होऊन 25 व्या वर्षात पक्ष पदार्पण करतो आहे. त्यामुळे अहमदनगरला 10 जूनला रॅली, सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अहमदनगरला मोठी सभा घेण्याचे प्रयोजित केले आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्र्यासोबत वज्रमूठ सभा होणार
जयंत पाटील म्हणाले की, वज्रमूठ सभेच्या तारखा या उन्हाळा असल्यामुळे नवीन निश्चित केल्या जातील. सभा जून महिन्यात होईल, परंतु जून महिन्यात पावसाला सुरूवात होणार असल्यामुळे या सभांना कदाचित मर्यादा येण्यचाी शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या एक-दोन सभा कदाचित जूनमध्ये होऊन जातील, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 10 जूनचा कार्यक्रम वेगळा आहे. पक्षाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम हा अहमदनगर शहरात होणार आहे. याशिवाय कर्नाटकात नुकत्याच निवडणुका पार पडल्या आहेत. काँग्रेसने बहुमताने विधानसभा निवडणुका जिंकल्या असल्यामुळे थोड्याच दिवसात मुख्यमंत्र्याचा शपथविधी होईल. हा शपथविधी झाल्यानंतर काँग्रेसचे नेते नवीन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि त्यांना जो योग्य वेळ वाटेल, त्या दिवशी त्यांना घेऊन वज्रमूठची आणखी एक सभा होईल, असे जयंत पाटील म्हणाले.

First Published on: May 17, 2023 4:05 PM
Exit mobile version