कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना निर्देश

मशिदींसमोरील भोंग्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी गृहमंत्रालयाची बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेचा तपशील गृहमंत्री दिलीप वळसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला. यावेळी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका. सर्व प्रकारची खबरदारी पोलिसांनी घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर महासंचालकांनी पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यातील कायदा सुव्यवस्थेविषयी माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन पोलिसांना योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले.

यावेळी त्यांनी पोलिसांना कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे सांगून कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका असेही सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालक यांचीही फोनवरुन राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा झाली. तर मुंबईत कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

First Published on: May 3, 2022 7:26 PM
Exit mobile version