आता मोबाईलरवही करा सिडकोच्या घराची नोंदणी

आता मोबाईलरवही करा सिडकोच्या घराची नोंदणी

सिडको आणि म्हाडा या घराच्या नोंदणीकरता नागरिकांचा अधिक कल असतो. मोठ्या संख्येने नागरिक या घरांच्या नोंदणी करतात. मात्र या घराच्या नोंदणीकरता लॅपटॉप अथवा संगणकाद्वारे अर्ज करावा लागतो. हा अर्ज करण्यासाठी नागिरकांना ज्या ठिकाणी इंटरनेटची सेवा आहे त्या ठिकाणी जावे लागते. त्यामुळे काही नागरिक या योजनेचा लाभ घेत नाहीत. मात्र सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेचा सर्व नागरिकांना अधिकाअधिक लाभ घेता यावा यासाठी सिडकोतर्फे घर नोंदणीसाठी एक नवीन मोबाईल अॅप लॉंच करण्यात आले आहे. या नवीन अॅपचा येत्या सोमवारी शुभारंभ करण्यात येणार आहे.

काय आहे हे अॅप?

ज्या नागरिकांकडे लॅपटॉप अथवा संगणक नाही अशा व्यक्तींना देखील घरच्या घरी सिडकोच्या घराची नोंदणीकरता यावी याकरता सिडकोने हे एक नवीन अॅप आणले आहे. हे अॅप अॅन्ड्रॉइड मोबाईलधारकांना गुगल प्ले स्टोअरमध्ये ‘सिडको ऑनलाईन २०१८’ या नावाने उपलब्ध करण्यात आले आहे. या अॅपमध्ये अर्ज करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक प्रकिया करण्यासाठी स्वत:चा फोटो काढणे, पॅनकार्ड, आधारकार्ड आणि धनादेश यांची माहिती अपलोड करण्यासाठी या अॅपद्वारे स्कॅन करता येणार आहे. याशिवाय, वेब अॅप्लिकेशनच्या तुलनेत मोबाईल अॅपवर नोंदणीचा ओटीपी तत्काळ प्राप्त होतो.

आता पर्यंत ८२ हजार अर्ज दाखल

सिडको महागृहनिर्माणतर्फे घरांची नोंदणीला १३ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. आता पर्यंत सिडकोच्या १४ हजार ८३८ घरांसाठी सोमवारपर्यंत ८२ हजार २३१ अर्जदारांनी अर्ज पूर्ण भरले असल्याची माहिती समोर आली आहे.

मोबाईलवर रक्कम भरणे सुरक्षित

इंटरनेट कॅफेसारख्या सार्वजनिक वेब अॅप्लिकेशनच्या तुलनेत मोबाईल अॅपवर अर्जाचे शुल्क आणि अनामत रक्कम भरणे अधिक सुरक्षित आहे.  – लोकेश चंद्र, व्यवस्थापकीय संचालक

First Published on: September 11, 2018 11:29 AM
Exit mobile version