नागरिक शास्त्रावर भर द्यायला हवा

नागरिक शास्त्रावर भर द्यायला हवा

विघ्नेश जोशी

निवेदक-विघ्नेश जोशी…

शाळेत अनेक विषय शिकवले जातात. त्यात नागरिक शास्त्र हा एक विषय असतो जो इतिहास या विषयाला जोडलेला असतो. या विषयाकडे गुणाच्या दृष्टीने फारसे पाहिले जात नाही. पण भविष्यात नागरिक सुजाण व्हावा, निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यात यायला हवी असेल तर नागरिक शास्त्र अधिक व्यापकतेने शिकवणे गरजेचे आहे. निवडणुकीत सामान्य मतदार नेहमी संभ्रमात असतो. नागरिक शास्त्रामुळे त्याची विचार करण्याची क्षमता वाढेल आणि मतदान कोणाला करायचे हे निश्चित होऊ शकते.

जात-धर्म याहीपेक्षा आपण भारतीय आहोत हा विचार मतदाराच्या मनात बिंबवणे गरजेचे आहे. कर्तव्य-अधिकार-हक्क असे बरेचसे शब्द मतदानासाठी लावले जातात. पण यात स्वर्थ विचार अधिक असतो. नागरिक शास्त्रामुळे भारताची जडण-घडण कशी आहे हे कळू शकते. मी कोणत्याही जाती-धर्माचा विचार करुन बोलत नाही. प्रत्येक समाजाचे स्वत:चे असे नियम आहेत. देशाचा विकास व्हायचा असेल तर कडक शासन आणणे गरजेचे आहे. लोकसंख्या ही भारताच्या विकासाला घातक ठरलेली आहे.

सरकारने त्याविषयी अजून कडक नीतीनियम अंमलात आणायला हवे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आजच्या पिढीने या गोष्टीचा विचार करुन लोकसंख्या आटोक्यात कशी येईल हे पाहिले पाहिजे. बेकारीचा प्रश्न हा विचार न पोहोचल्यामुळे वाढलेला आहे.

First Published on: April 14, 2019 4:41 AM
Exit mobile version