नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजप-सिंधु महासभा रस्त्यावर

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ भाजप-सिंधु महासभा रस्त्यावर

देशात विविध ठिकाणी नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात हिंसाचार उफाळला असून त्यात अनेकांचे बळी गेले आहेत.हे लोन अद्यापही संपले नसताना आज उल्हासनगरातील भाजप व भारतीय सिंधु महासभा कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहे. भारत पाकिस्तान फाळणी झाल्यावर सिंधी बांधवांना भारतातील विविध राज्यांत,शहरात आश्रय देण्यात आला. मात्र अद्यापही पाकिस्तानात सिंधी, हिंदू राहत असून त्यांना भारतात यायचे आहे.मात्र त्यास नागरिकत्वाची अडचण येत होती. लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा कायद्यावर शिक्कामोर्तब झाले असून तो योग्यच आहे. काही मंडळी गैरसमज पसरवत आहेत असा आरोप करून आमचे कायद्याला पूर्णताः समर्थन असल्याचे निवेदन रस्त्यावर उतरणार्‍या भाजप व भारतीय सिंधु महासभेने प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार कपिल घोरपडे यांना दिले आहे.

या आंदोलनात आमदार कुमार आयलानी, स्थायी समिती सभापती राजेश वधारिया,गटनेते जमनु पुरस्वानी,महेश सुखरामानी, प्रकाश माखीजा, चार्ली पारवानी, मनोज लासी,सुनील राणा, मनु खेमचंदानी,ढालू नाथानी,सुभाष तनावडे, प्रशांत पाटील, आनंद शिंदे, कपिल अडसुळ,महेश मूलचंदानी, मंगला चांडा, अर्चना करणकाळे आदी मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

First Published on: December 25, 2019 1:58 AM
Exit mobile version