सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छता अभियान

सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छता अभियान

सरकारी रुग्णालयांमध्ये स्वच्छता अभियान

रुग्णालय परिसर स्वच्छ असेल तर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांनाही बरं वाटतं. याच पार्श्वभूमीवर निरंकारी फाऊंडेशनतर्फे स्वच्छता अभियान राबवण्यात आली. संपूर्ण भारतात हे अभियान राबवलं जात असून त्याअंतर्गत सरकारी रुग्णालयांची स्वच्छता प्रामुख्याने करण्यात आली. बाबा हरदेव सिंग यांच्या ६५ व्या जयंती निमित्त हे अभियान राबवण्यात आलं. निरंकारी फाऊंडेशनकडून देशातील ३५० शहरातील ७६५ हून अधिक रुग्णालयांची स्वच्छता करण्यात आली. त्यात मुंबईतील केईएम, जे.जे , लोकमान्य टिळक आणि राजावाडी या रुग्णालयांचा समावेश होता. या स्वच्छता अभियानात ३ लाखांहून अधिक अनुयायी सहभागी झाले होते.

४० रुग्णालय केले स्वच्छ

सरकारी किंवा पालिका रुग्णालयांमध्ये जेवढी रुग्णांची गर्दी असते तेवढाच कचरा देखील पाहायला मिळतो. त्यामुळे, बाबा हरदेव महाराज यांच्या अनुयायांनी हा रुग्णालयांना स्वच्छ करण्याचा विडा उचलत रुग्णालयांची मोठ्या संख्येने स्वच्छता केली. त्यासोबतच मुंबईतील ४० रुग्णालयांची स्वच्छता या कार्यकर्त्यांनी केली. संपूर्ण भारतात हे अभियान राबवलं गेलं. कोणतीली अपेक्षा न ठेवता ही स्वच्छता केली जात असल्याचं यावेळी केईएम रुग्णालयात स्वच्छता करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. निरंकारी फाऊंडेशनकडून अनेकदा स्वच्छतेसाठी उपक्रम हाती घेतला जातो. या फाऊंडेशनकडू रेल्वे स्टेशन, सार्वजनिक ठिकाणे असू देत अशा प्रकारे स्वच्छता केली जाते. त्यानुसार, शनिवारी भारतातील ७०० हून अधिक रुग्णालय साफ करण्याचा निर्णय घेतला.

First Published on: February 23, 2019 8:16 PM
Exit mobile version